राष्ट्रवादी फुटीनंतर पवार घरण्यातही गोंधळ वाढला; अजितदादांचा पुतण्या ‘आजोबा’ भेटीला!

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या आमदारांमधील एका आमदारांनी आज अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. शपविधीच्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेलेले अनेक आमदार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत गेले. तर शरद पवार यांच्या गाठीभेटी घेतलेले बैठकीला उपस्थित असलेले आमदार अजित पवार गटाकडे गेले आहेत.

अशातच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार घरण्यातही फुट पडल्याचे दिसून येत आहे. तर अजित पवार यांचा पुतण्या शरद पवार यांच्या भेटीला गेला आहे. अजित पवार यांचे श्रीनिवास पवार सख्खे भाऊ आहेत. तर युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे आहेत. सध्या ते शरद पवार यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांचे पुतणे व उद्योजक श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वर्तविली जात होती .ते गेल्या काही दिवसांपासून बारामतीतील विविध सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी युगेंद्र पवार यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार यांच्यासोबत युगेंद्र हे अनेक वेळा दिसतात.अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळे बारामतीतील राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे बारामतीमध्ये राष्ट्रवादीला नव्या चेहऱ्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळ मधून खासदार होण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्या निवडणुकीत पार्थ यांचा झालेला पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला आहे. अजित पवार भाजपमध्ये गेल्यामुळे पार्थ पवारांचा राजकीय प्रवास सोपा होण्याची शक्यता आहे. एकंदरीत रोहित पवार यांच्या नंतर युगेंद्र पवार देखील राजकारणात सक्रिय होणार असल्याची दाट शक्यता या निमित्ताने निर्माण झाली आहे. तर त्यांच्या या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता