आक्रमक अजित पवारांनी संजय राऊतांनाही सुनावलं; आमच्या पक्षाचे वकीलपत्र घेऊ नका

0
1

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असतानाच आज अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना शिंदे-फडणवीस सरकारवर कडाडून टीका केली. तसेच यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांनाही सुनावलं आहे.

अजित पवार म्हणाले, ”कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. अशा बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. माझ्या बद्दल एवढं काय प्रेम उथू चाललं आहे. 40 आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. आम्ही राष्ट्रवादीत राहणार आहोत. इतर राजकीय पक्षाचे नेते याबाबत बोलत आहेत. मात्र मी त्याबाबत बोलणार नाही”, असं ते म्हणाले आहेत. आमदारांच्या भेटीबाबतही त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, ”प्रत्येक मंगळवारी आमदार मला भेटतात, हे नेहमीचे आहे. अनेक आमदारांचं काम होतं म्हणून आले होते, त्याचा वेगळा अर्थ काढू नका”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

तसेच अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या वावड्या असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. या मुद्द्यावर बोलताना अजित पवार यांनी संजय राऊत यांना चांगलच सुनावलं आहे. ते म्हणाले की, ”त्यांनी (संजय राऊत) आमच्या पक्षाचे वकीलपत्र घेऊ नका”, असं म्हणत संजय राऊतांना नाव न घेता टोला लगावला आहे.