मुख्यमंत्री शिंदेंचा राजयोग संपला? फडणवीस- पवार मैत्री दीर्घकाळ? पत्रिकेत हे योग: डॉ. धारणे

0

राज्यातील राजकीय अस्थिरता बघता नाव, राशी, कुंडली काय सांगतात, याचा शोध घेतला असता राज्याच्या सध्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोघांमध्ये नैसर्गिक मैत्री असून, राजकारणात ती दीर्घकाळ दिसेल, असे भाकीत ज्योतिषवाचस्पती डॉ. नरेंद्र धारणे यांनी केले आहे.

डॉ. धारणे यांनी सांगितले, की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांची रास कुंभ आहे. पण जन्म नक्षत्र वेगळे आहे. तसेच दोघांचा वाढदिवसही जुलैमध्येच येतो. त्यामुळे दोघांमध्ये नैसर्गिक मैत्री आहे. ती राजकारणात दीर्घकाळ दिसेल. अजितदादा आणि फडणवीस या दोघांना साडेसाती चालू आहे. दोघांच्या कुंडलीत शनी बलवान आहे. त्यामुळे चालू साडेसाती दोघांना राजकीय उच्चपद देईल, असे योग आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

अजितदादांना राजयोग

राज्यातील चालू राजकीय घडामोडींत नजीकच्या काळात अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे योग आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रास धनू असून, मूळ नक्षत्र, शुक्र, गुरू युती राजयोगमुळे ते उच्चपदी विराजमान आहेत. तो राजयोग गोचर ग्रहस्थितीनुसार सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे ते त्या पदावर राहतीलच, असे कुंडलीवरून वाटत नसल्याचे स्पष्ट मत डॉ. धारणे यांनी व्यक्त केले.

विरोधी पक्षाच्या भूमिकेतच राहावे लागणार

खासदार सुप्रिया सुळे यांची रास धनू, तर उद्धव ठाकरे यांची सिंह रास असून, राज ठाकरे यांची तुला रास आहे. या तिघांच्या कुंडलीत सध्या तरी सत्ता मिळण्याचे राजयोग नाहीत. त्यामुळे पुढील सात वर्षे त्यांना विरोधी पक्षाच्या भूमिकेतच राहावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आगामी सहा महिन्यांत आरोग्य समस्येमुळे राजकीय निवृत्ती घेतील, असेही भाकीतही डॉ. धारणे यांनी व्यक्त केले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा