मुश्रीफांना भाजपला पाठिंबा देताच दिलासा, ED तपास अधिकाऱ्यांना कोर्टाचा हा मोठा आदेश

0

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह आमदारांनी पक्षाविरोधात बंड केला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या ८ आमदारांमध्ये हसन मुश्रीफ यांचे नाव खूप चर्चेत आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांच्यावर ईडीची रेड देखील पडली होती.

दरम्यान आता हसन मुश्रीफ यांच्या खांद्यावर सरकारमध्ये मोठी जबाबदारी येऊ शकते. भाजपला पाठिंबा देताच हसन मुश्रीफ यांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. हसन मुश्रिफ यांना हायकोर्टाचा दिलासा कायम आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रिफ यांनी कोर्टात याचिका केली होती. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांना कोर्टापुढे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हसन मुश्रीफ यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते सध्या कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. याशिवाय हसन मुश्रीफ यांनी ग्रामीण विकास आणि कामगार मंत्रालयातही मंत्रीपद भूषवले आहे.