उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का, पुन्हा ६ आमदार शिंदेंच्या वाटेवर! येथे भेटायचं ठरलंही

0

अजित पवार यांच्या सत्तेत येण्याने शिंदे गटात नाराजीची चर्चा आहे. मंत्रिपदावरुन देखील गोंधळ निर्माण झाला आहे. शिंदे गटाच्या मंत्रिपदाला कात्री लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांची नाराजी दूर करण्याच्या कामाला लागले आहेत. काल एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर सर्व आमदारांची बैठक घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी मोठं विधान केले आहे. “शिवसेनेत नाराजी असल्याच्या केवळ अफवा आहेत. आमच्यात मंत्रिपदावरुवन कोणतीही वादावादी झाली नाही आणि होणार नाही. कोणीतरी सांगितले की ६ ते ७ आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत. मात्र ही गोष्ट खरी नाही,” असे सामंत म्हणाले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

उद्धव ठाकरे गटातील सहा आमदार आमच्या संपर्कात आहेत. काल माझी चर्चा देखील झाली आहे. ठाकरे गटातील आमदार म्हणतात आपल्याला मुंबईत भेटायचे नाही. मुंबईच्या बाहेर भेटूया, असे विधान उदय सामंत यांनी केले आहे. सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करत आहेत. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे ठाकरे गटातील आमदार आमच्यासोबत यायला तयार आहेत.