पहिल्याच कॅबिनेटमध्ये मिठाचा खडा! शिंदेंच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर

0

अजितदादांच्या सहभागानंतर युती सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत खटके उडायला सुरुवात झाली आहे. रायगडच्या कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांना स्विकारणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

आमची भूमिका आता हीच आहे की, सुरुवातीला प्रचंड प्रमाणात मतभेद होते. आता एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवून रायगडचे आम्ही तिन्ही आमदार त्यांच्यासोबत काम करत आहोत. आता ज्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत, त्यानंतर आम्ही सर्व आमदार जरी संभ्रमात असलो तरी मुख्यंमत्री शिंदे यावर मार्ग नक्कीच काढतील.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

आत्ता ज्या घडामोडी घडत आहेत त्या पक्षहितासाठी फायदेशीरच असतील असं मला वाटतं. पण रायगडचे पालकमंत्री म्हणून आम्ही आदिती तटकरे यांचा स्विकार करणार नाही, हे स्पष्टपणे सांगतो, अशा शब्दांत आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.