सिंधुदुर्ग: काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली.याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. दिल्लीमध्ये शिंदे-फडणवीस सरकारचा हाय कमांड बसला आहे. शिंदे-फडणवीस दिल्लीत जाऊन मुजरा करतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांच्या टीकेला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.भाजपचे नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. नितेश राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांची शिवसेना चायनीज शिवसेना आहे. खरी शिवसेना दिल्लीत जात नाही, असे तुम्ही म्हणता. मग तुमचे मालक उद्धव ठाकरे जनपथवर साडी नेसून जायचे का? दिल्लीत मातोश्रीची आई आहे का?”
पुढे बोलताना ते म्हणाले, “संजय राऊत यांचे मालक कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून परदेशी दौरे करत आहे. दुसऱ्यांना नैतिकता शिकवणाऱ्यांनी कधी स्वतः राजीनामा दिला आहे का?”“तुमच्या मालकाच्या सरकारमध्ये अनेक लोकांचे जीव गेले. तेव्हा तुम्हाला पश्चाताप झाला नाही का? नैतिकतेची भाषा तुम्ही करू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यापेक्षा तुमच्या मालकाने काय केलं ते आम्हाला सांगा”, अशा शब्दात नितेश राणेंनी संजय राऊत आणि ठाकरे गटावर खोचक टीका केली आहे.