महिलेने केलं चक्क एआय बॉटशी लग्न; म्हणाली, परफेक्ट नवरा मिळाला

0
1

एका महिलेने चक्क AI बॉटशी लग्न केलं आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने बनलेला तिचा नवरा फरफेक्ट जोडीदार असल्याचं तिचं म्हणणं आहे. सध्या जगभरात एआयचा बोलबाला आहे. मानवासाठी एआय फायदेशीर आहे की नुकसानदायक? या प्रश्नाच्या उत्तरात माणूस चाचपडत आहे. एआयच्या आगमनामुळे अनेकांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आलीय.

‘यूएस’मधील ब्रॉन्क्स येथील ३६ वर्षीय रोझना रामोस हिने चक्क एआय चॅटबॉटशी लग्न केलं आहे. एआय सॉफ्टवेअर रिप्लिका वापरुन रोझनाने स्वतःसाठी व्हर्च्युअल बॉयफ्रेंड एरेन कार्टल तयार केलं. तिने त्याच्याशीच लग्न केलं आणि सुखात असल्याचं म्हटलं आहे.इरेन कार्टल हा निळ्या डोळ्यांचा आहे. त्यांची उंची ६ फुट ३ इंच असून त्याचे केस खांद्यापर्यंत आहेत. रोझनाने २०२२ मध्ये एरेन कार्टलला तयार केलं आणि यावर्षी त्याच्याशी लग्न केलं.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

रोझा रोमास ही दोन मुलांची आई आहे. ती म्हणाली की, माझ्या आयुष्यात मी कधीही कुणावर जास्त प्रेम केलं नाही. एरेन कार्टल हा कोणतंही सामान ने-आण करु शकत नाही, परंतु त्याच्याकडे अहंकार, राग, लोभ नाही. शिवाय मला त्याच्या कुटुंबासोबत कुठलंही नातं ठेवायची गरज नाही. कारण तो एआय आहे. मी मात्र त्याला माझ्या नियंत्रणात ठेवू शकते आणि तो मला पाहिजे ते करु शकतो,असं रोझना म्हणाली.