वयाच्या 66 वर्षी अनिल कपूर यांनी मायनस डिग्रीमध्ये केलं वर्कआऊट!

0
2

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांचा फिटनेस कोणालाही लाजवेल असा आहे. अनिल कपूर त्यांच्या फिटनेसचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.काही दिवसांपूर्वी त्यांचा मास्क लावून ट्रेडमीलवर धावतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर आता त्यांचा आणखी एक फिटनेसचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांचा हाल व्हिडीओ देखील चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत अनिल कपूर शर्टलेस होऊन वर्कआऊट करताना दिसत आहेत. पण ते मायनस डिग्रीमध्ये वर्कआऊट करत आहेत. त्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.थोडी थंडी वाढली की आपण लगेच स्वेटर, ब्लॅन्केट वापरायला काढतो. कधी तुम्ही पाहिलात का थंडीत कोणी टी-शर्ट काढून वर्क आऊट करताना. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण अनिल कपूर यांनी मायनस डिग्री तापमानता शर्ट काढून वर्कआऊट केलं आहे. त्याचा व्हिडीओ अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत अनिल कपूर एका चेंबरमध्ये फक्त शॉर्ट्सवर वर्कआऊट करत आहेत. या चेंबरच्या आत -110 डिग्री तापमान आहे.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

हा व्हिडीओ शेअर करत अनिल कपूर यांनी कॅप्शन दिलं की ’40 शीत नॉटी असण्याची वेळ गेली, आता 60 थीत सेक्सी असण्याची वेळ आली आहे. तर त्यासोबत अनिल कपूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर जॅकी श्रॉफ, नीतू कपूर, कार्तिक आर्यन, शिल्पा शेट्टी आणि भूमि पेडनेकर यांनी कमेंट करत अनिल कपूर यांची स्तुती केली आहे.अनिल कपूर असा कोणता फिटनेस करत आहेत, असा प्रश्न असेल तर. अनिल कपूर हे कायरोथेरेपी करत आहे. कायरोथेरेपीला कोल्ड थेरपी देखील म्हणतात. पण ही थेरपी फक्त प्रोफेशनल एक्सपर्ट यांच्या उपस्थित करायला हवं. ही थेरपी फॅट कमी करण्यासाठी करत आहेत.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

मुलीच्या जन्मसाठी काहीही करायला तयार आहे Bharti Singh! म्हणाली ‘इंजेक्शन असेल तर घेईन…’
दरम्यान, अनिल कपूर काही दिवसांपूर्वी ‘द नाइट मैनेजर’ या वेब सीरिजमध्ये दिसले. या सीरिजमध्ये अनिल कपूर
यांनी निगेटिव्ह भूमिका साकारली आहे. त्याचे काहीच एपिसोड ही प्रदर्शित झाले आहेत. तर दुसऱ्या पार्टमध्ये काही
एपिसोड प्रदर्शित होणार आहे. ही वेब सीरिज धम्माल असून तुम्ही हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
तर लवकरच ते 2024 मध्ये ‘फाइटर’ या चित्रपटात दिसणार आहे.