पिंपरी चिंचवड : पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनअर असलेल्या ३० वर्षीय विवाहितेवर पतीसह चौघांनी अत्याराच केल्याची खळबळजनक घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पतीने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले.त्यानंतर आपल्याच मित्रांना तिच्यावर वेगवेगळ्या दिवशी लैंगिक अत्याचार करायला लावले. याशिवाय त्याचं शूटिंगही केलं. यानंतर पती तिला ब्लॅकमेल करत होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या ३० वर्षीय महिलेनं पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार पतीने सप्टेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत मित्रांसोबत मिळून अत्याचार केल्याचं म्हटलं आहे. महिला आणि तिचा पतीसुद्धा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. पतीने जबरदस्तीने तिच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवले.पतीने त्याच्या मित्रांना पत्नीसोबत संबंध ठेवायला सांगितले. वेगवेगळ्या दिवशी लैंगिक अत्याचार करत त्याचे शूटिंगही केले. या अत्याचाराचे व्हिडीओ तिला दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. जेव्हा अनैसर्गिक संबंधाला तिने नकार दिला तेव्हा पतीने तिला शिवीगाळ केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले
अख्तरची 3 लग्न अन् एक गर्लफ्रेंड, बोपदेवच्या नराधमाचे धक्कादायक कारनामे समोर
पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अख्तर शेख याचे धक्कादायक कारनामे पोलीस चौकशीत उघडकीस आले आहेत. अख्तर शेखनं आतापर्यंत 3 महिलांशी लग्न केल्याची माहिती उघडकीस आली आहे, यातील दोन महिला नागपुरातील तर एक उत्तर प्रदेशातील आहे. याशिवाय आणखी एका तरुणीशीही त्याचे संबंध असल्याचं चौकशीत समोर आलंय. गुन्हा करताना त्याने गांजा प्यायलेला असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. या प्रकरणी अख्तरला 23 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.