‘चोलामंडलम’कडून संभाजीनगर जिल्ह्यास दोन अत्याधुनिक ॲम्बुलन्स सुपूर्त

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास दोन सुसज्ज ॲम्बुलन्स

0
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास दोन अत्याधुनिक व सुसज्ज ॲम्बुलन्स हस्तांतरित
दोन अत्याधुनिक ॲम्बुलन्स हस्तांतरित

छत्रपती संभाजीनगर– सामाजिक बांधिलकीचे भान राखत चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यातर्फे सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास दोन अत्याधुनिक व सुसज्ज रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) नुकत्याच हस्तांतरित करण्यात आल्या. या ॲम्बुलन्समध्ये स्कॅनिंग मशीनसह अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे देण्यात आली असून, जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे.

या विशेष कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. महाराष्ट्र राज्य कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) श्री. विनयकुमार आवटे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, निवासी जिल्हाधिकारी श्री. विनोद खिराळकर, उपजिल्हाधिकारी श्री. प्रवीण फुलारे, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. अभय धानुरकर, जिल्हा कृषी अधीक्षक श्री. प्रकाश देशमुख, विभागीय बँक व्यवस्थापक श्री. मंगेश केदार, तसेच कृषी उपसंचालक श्री. दीपक गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सूर्यनारायण, श्री. शंकर नारायण, श्री. महेंद्र त्रिपाठीश्री. अभिजीत नादोडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमात पुढाकार घेतला. या दोन्ही ॲम्बुलन्स छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या दर्जात मोलाची भर घालतील आणि आपत्कालीन सेवा अधिक गतिमान होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.