” जी- २०, स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मिशन २०२३” अन्वये पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापण विभागाच्या वतीने मा. उप आयुक्त मा. आशा राऊत व सहाय्यक आरोग्य प्रमुख मा. केतकी घाटगे यांच्या उपस्थितीत कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त मदीकुंट व वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम यांच्या मार्गदर्शना खाली तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे व गणेश खिरीड यांच्या नेतृत्वाखाली सिंहगड डेंटल, मराठावाडा महाविद्यालय, हरितमित्र, नेहरू युवाकेंद्र, कमिन्स इंडिया लिं. कंपनी, जनवाणी सहकारी संस्था, स्वच्छ सहकारी संस्था, रोटरी क्लब ऑफ सहवास पुणे, अर्थ फाऊंन्डेशन, हर्षदीप फाऊंडेशन, सेवा सहयोग या सर्व स्वयंसेवी संस्थेच्या वतीन कर्वे पुतळा याठिकाणी दोन्ही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी पर्यावरणाच्या संदर्भात पथनाटय सादर करण्यात आले.
सदर पथनाट्यद्वारे आजच्या परिस्थितीमध्ये विशेषतः औद्योगिकरणामुळे शहराची लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे दऱ्या खोऱ्या, डोंगर झाडाझुडपांचा नाश होऊन त्या ठिकाणी सिमेंटचे जंगले उभे राहत आहेत त्यामुळे मानवाच्या हातून पर्यावरणाचा -हास होत आहे. याचा परिणाम तापमानात वाढ, पावसाचे प्रमाण कमी होणे, जमिनीतील पाण्याचा साठा कमी होणे, वाढत्या तापमानामुळे जमिनीची धुप वाढल्यामुळे धान्याचे उत्पादनात घट होत असल्याचे दिसून येत आहे. जंगल तोडीमुळे वन्य प्राण्यांचे व पशु पक्षांचे प्रमाण कमी होत आहेत. नैसर्गिक नदी, नाल्यांचा प्रवाह देखील मानव गिळंकृत करत आहे. औदयोगिकरणामुळे कारखानदारी वाढली त्यामुळे नदी नाल्यात घाण पाणि सोडणे, कचरा टाकणे, मयत जनावरे प्रवाहात टाकाणे याप्रकारामुळे पाणि दुषीत होणे तसेच प्लॅस्टिकच्या वापरामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यात आली आहे.
या सर्व समस्यांचे जीवसृष्टीवर अतिशय वाईट परिणाम होत आहे याविषयी जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच तत्कालीन नटश्रेष्ठ राजकुमार यांच्या चार्लीनचापलीनच्या भूमिकेतील जेष्ठ कलाकार चार्ली वरप्रभू यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा, पाण्याचा जपून वापर करा, प्लॅस्टिकचा वापर टाळा, पर्यावरणाचे रक्षण करा, झाडू तोडू नका, डोंगर फोडून पर्यावरणाचा नायनाट करू नका असा संदेश गाण्याच्या माध्यमातून दिला. तद्नंतर उपायुक्त आशा राऊत, डॉ. केतकी घाटगे, आम्रपाली चव्हाण, यशवंत मानखेडकर, रोटरीचे किरण इंगळे, सोनल पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच थोरांत उद्यान येथे मान्यवरांच्या हस्ते ५० झाडे लावण्यात आले. तसेच पर्यावरण दिनाचा संदेश देण्यासाठी कोथरूड व डहाणूकर परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली.
तद्नंतर सुतार दवाखान्यात उपायुक्त आशा राऊत व सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. केतकी घाटगे यांच्या हस्ते कापडी पिशवींचे एटीएम मशिन बसवण्याचे उद्घाटन करण्यात आले. सदर एटीएम मशिनमध्ये १०₹ टाकले की १ कापडी पिशवी बाहेर येते. सदर सुतार दवाखान्याच्या परिसरात भाजीविक्रीचे मंडई असल्याने नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी सदर एटीएम मशीन मध्ये नागरिकांनी दहा रुपये टाकून एक कापडी पिशवी घ्या आणि भाजी खरेदी करा असा संदेश देण्यात आला. सदर मशिन मध्ये कापडी पिशव्या पुरविण्याचे जबाबदारी हर्षदीप फाउंडेशनच्या ज्योती बेंगाळे यांनी घेतली.
सदर जागतिक पर्यावरण दिनाच्या विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य निरिक्षक, सचिन लोहकरे, करण कुंभार, वैभव घटकांबळे, प्रमोद चव्हाण, रूपाली शेडगे, शिवाजी गायकवाड, गणेश चोंधे, संतोष ताटकर, गणेश साठे तसेच मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, लक्ष्मण चव्हाण, साईनाथ तेलंगी, संजय कांबळे, सुभाष पडये, अशोक कांबळे इत्यांदीनी परिश्रम घेतले.