२०२४ चा निकाल आश्चर्यचकित करणार असेल, भाजप सत्तेतून बाहेर जाणार; राहुल गांधींचा अमेरिकेतून मोठा अंदाज

0
1

काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या दोन दिवसापासून अमेरिका दौऱ्यावर आहेत, त्यांनी अमेरिकेतून भाजपवर निशाणा साधला आहे.काल राहुल गांधी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवरुन मोठं विधान केलं. राहुल गांधी म्हणाले, २०२४ चा निकाल आश्चर्यचकित करणारा असेल. भाजप सत्तेतून जाणार असल्याच मोठं विधान गांधी यांनी केलं.राहुल गांधी म्हणाले, विरोधक एकजूट आहेत आणि आम्ही पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला सत्तेतून बाहेर काढू. वॉशिंग्टन येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी ही माहिती दिली. ‘माझा विश्वास आहे की काँग्रेस पुढच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करेल. मला वाटते की ही निवडणूक लोकांना आश्चर्यचकित करेल. तुम्ही गणित करा. एकजूट विरोधक भाजपचा पराभव करतील. देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांना जेमतेम वर्ष उरले असून त्याआधी राहुल गांधींचे हे भाकीत महत्त्वाचे आहे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

काँग्रेसचे माजी खासदार म्हणाले, ‘विरोधक चांगलेच एकवटले आहेत. आम्ही सर्व विरोधी पक्षांशी चर्चा करत आहोत. मला वाटते की ऐक्याबद्दल एक चांगली गोष्ट चालू आहे. हे थोडे क्लिष्ट देखील आहे कारण अनेक ठिकाणी आपली स्पर्धा विरोधी पक्षांशी आहे, ज्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे निवडणुकीत कुठेतरी पाठिंबा घ्यावा लागतो आणि कुठेतरी द्यावा लागतो. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधकांची महाआघाडी पाहायला मिळेल, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

गेल्या काही महिन्यांपूर्वी गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करणअयात आले आहे. लोकसभेचे सदस्यत्व गमावल्याने मला फायदा होईल, असे राहुल गांधी म्हणाले. ‘यामुळे मला स्वतःला बदलण्यास मदत होईल. मला वाटते त्यांनी एक भेट दिली आहे. त्यांना माहित नाही, पण त्यांनी तेच केले. भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, त्यांना जम्मू-काश्मीरला जाण्यापासूनही रोखले.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ