रायगडावर मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा आज तिथीनुसार साजरा झाला. मात्र, राज्यातील बडा नेता नाराज होऊन तडकाफडकी रायगडावरून निघून गेल्याची घटना घडली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमामध्ये बोलण्याची संधी न दिल्याने राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे नाराज होऊन होऊन तडकाफडकी रायगडावरून निघून गेले.
नेमकं काय घडलं?
छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा राज्य सरकारच्या वतीने होत असताना मी एक शिवप्रेमी आणि नागरिक म्हणून सहभागी झालो. सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. पण यावेळी राजशिष्टचाराचे नियम पाळले नाहीत. नियम पायदळी तुडवले. त्यामुळे मी इथून जाण्याचा निर्णय घेतला.
तसेच, मला बोलून देतील असं वाटलं होतं पण तसं झालं नाही. राजशिष्टचाराचे नियम पाळले नाहीत. नियोजनांमध्ये अभाव होता. राज्य सरकारचा कार्यक्रम होता पण काही जण आपण स्वतःहून कार्यक्रम करत आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करत होते. असही तटकरे म्हणाले.
पवारांनी मार्गदर्शन करावं
तटकरे यांच्या नाराजीवर मंत्री दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेकाचा सोहळा आहे, त्यात कोणी मानापमानाने येऊ नये. तटकरे हे ज्येष्ठ नेते आहेत. पवारांनी त्यांना थोडे मार्गदर्शन करावे असे मला वाटते. हा सोहळा राजकीय नव्हता, असे दीपक केसरकर म्हणाले.