गौतम अदानींनी पुन्हा भेट घेण्यामागे कारण काय? खुद्द शरद पवारांनी केला खुलासा; म्हणाले…

0

Gautam Adani-Sharad Pawar Meet: एकीकडे काँग्रेसने हिंडेनबर्ग अहवालावरून अदानी समूहावर प्रश्नांची सरबत्ती करत हल्लाबोल केला असून, दुसरीकडे अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे.काही दिवसांपूर्वी गौतम अदानी हे शरद पवार यांना भेटले होते. लगेच पुन्हा एकदा गौतम अदानी शरद पवार यांच्या भेटीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. या भेटीबाबत खुद्द शरद पवार यांनी खुलासा केला आहे.हिंडनबर्ग अहवालानंतर विरोधक अदानी समूह आणि केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विरोधकांनी जेपीसीची मागणी केली आहे. पण, याउलट शरद पवारांनी जेपीसीची गरज नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. यानंतर आता पुन्हा एकदा गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

गौतम अदानींनी पुन्हा भेट घेण्यामागे कारण काय? गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यातील ही बैठक तब्बल अर्धा तास चालली होती. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, ही भेट टेक्निकल होती. सिंगापूर येथील एक प्रतिनिधीमंडळ माझ्याकडे आले होते आणि त्यांना काही टेक्निकल मुद्द्यांवर उद्योगपती गौतम अदानी यांची भेट घ्यायची होती. यादरम्यान गौतम अदानी आणि सिंगापूर प्रतिनिधीमंडळ यांच्यात ही बैठक झाली. मात्र हा टेक्निकल मुद्दा होता. त्यामुळे याबद्दल मला अधिक काही माहिती नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.दरम्यान, शरद पवारांनी या बैठकील टेक्निकल म्हणत विषय टाळला असला तरी महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात यामुळे चर्चांना उधाण आले आहे. याआधी हिंडनबर्ग रिपोर्ट प्रकरणात गौतम अदानी यांची बाजू घेतली होती. त्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती