राजकोटच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या सुरक्षेसह रचनेबाबत काय काळजी घेण्यात आली? शिल्पकार अनिल सुतार म्हणाले…

0
3

काही महिन्यांपूर्वी राजकोटमध्ये कोसळलेल्या राजकोटचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता नव्याने पुन्हा एकदा दिमाखात उभा राहिला आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने देशभरात महाराष्ट्राची नाचक्की झाली. मात्र आता मागच्या चूका जाणून घेत या नव्या पुतळ्याचे शिल्पकार अनिल सुतार यांनी पुतळ्याची मजबुती, रचना आणि टिकाऊपणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

छत्रपती शिवरायांचा हा 40 फुटांचा भव्य पुतळा 26 ऑगस्ट 2024 ला दुपारी 1 च्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. पंतप्रधान नरेंद्र मोंदींना पुतळा पडल्याबद्दल माफी मागावी लागली. त्यानंतर वर्षभराच्या आत 83 फुटांचा छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला. योग्य देखभाल न केल्याने गंज आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे पडलेल्या या पुतळ्यानंतर राजकीय वतावरणही तापले होते. जगविख्यात शिल्पकार आणि पद्मश्री राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल सुतार यांनी छत्रपती शिवरायांचा तब्बल 83 फूट उंचीचा पुतळ्याची उभारणी केलीय. या पुतळ्याच्या सुरक्षेबाबत आणि रचनेबाबत काय काळजी घेण्यात आलीय?

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

नव्या पुतळ्याबाबत पुतळ्याचे शिल्पकार काय म्हणाले?

आयआयटीचे अभियंते आणि जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे शिल्पकारही या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी होते. या पुतळ्याची रचना इतकी भक्कम आहे की, वादळं, पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तींचाही विचार करून तो तयार करण्यात आला आहे. जमिनीपासून 93 फूट उंचीचा हा पुतळा असून त्यावर 10 फूट उंचीचा चबुतरा आहे. त्यामुळे हा पुतळा एकूण 103 फूट उंचीचा आहे, जो देशातील सर्वात उंच शिवपुतळा ठरतो.

अनिल सुतार म्हणाले, “मागील वेळचा पुतळा का कोसळला, याचा अभ्यास केला. त्यामध्ये केवळ लोखंडाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे काही महिन्यांतच त्याला गंज लागून कमकुवत झाला आणि वादळात कोसळला. त्यांनी पुढे सांगितले की, “या वेळेस आम्ही अशा चुकांची पुनरावृत्ती होऊ दिली नाही. नवीन पुतळा उभारताना आम्ही ब्राँझ आणि झिंक यांसारख्या धातूंचा वापर केला आहे. हेच धातू आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्येही वापरत आहोत.”नवीन पुतळ्याची रचना अशी करण्यात आली आहे की, तो चक्रीवादळासारख्या तीव्र हवामानातही ताठ उभा राहील. त्याची उंची देखील लक्षणीय आहे.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

सुतार यांनी सांगितले, “महाराजांच्या मूळ पुतळ्याची उंची 60 फूट असून तलवारीपर्यंत त्याची एकूण उंची 93 फूट आहे. त्यासोबत 10 फूट उंचीचा चबुतरा देखील आहे.” डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याबद्दल बोलताना अनिल सुतार म्हणाले, “हा एक भव्य प्रकल्प आहे. त्यासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.” नवा पुतळा अधिक मजबूत, हवामान बदलांना तोंड देणारा, आणि दीर्घकाळ टिकणारा असा उभा राहिल्याने प्रशासन आणि जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आता या भव्य पुतळ्याच्या माध्यमातून शिवरायांची शौर्यगाथा आणि इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या!