सनी लिओनीची ग्लॅमरस लुकसह कान्स 2023 मध्ये एंट्री!

0
Sunny Leone

सनी लिओनी तिच्या फॅशन गेम साठी ओळखली जाते तिने 76 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये चमकदार पदार्पण केल्याने ती चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या आकर्षक फॅशन प्रतिष्ठित कान्स रेड कार्पेट वर  सनी लिओनीने पुन्हा एकदा सगळ्यांची मन जिंकली आहेत.

प्रतिभावान अभिनेत्रीने तिच्या बहुप्रतिक्षित चित्रपट “केनेडी” च्या प्रमोशनसाठी कान्स मध्ये सहभागी होत आहे ज्याला या वर्षी मिडनाईट स्क्रिनिंगसाठी आदरणीय कान्स ज्युरीने निवडलेला एकमेव भारतीय चित्रपट असण्याचा उल्लेखनीय गौरव बहाल केला आहे.

सनी लिओनीने तिच्या उत्तम फॅशन आणि ग्लॅमरस लूक ने सगळ्यांची मन जिंकून घेतली. तिचे क्लासिक ब्लॅक-अँड-व्हाइट कॉम्बिनेशन ने अफलातून दिसतेय. प्रसिद्ध डिझायनर गेमी मालोउफ (  Gemy Maalouf ) यांच्या ब्लॅक ऑफ-शोल्डर क्रॉप टॉपसह बिसीबीजीमॅक्सअझीरिया ( BCBGMAXAZRIA ) या प्रतिष्ठित ब्रँडच्या स्लीक व्हाईट पँटसह हा खास कॉस्च्युम तयार करण्यात आला.

अधिक वाचा  नगराध्यक्षांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत आनंदाची बातमी, सदस्यत्व व मताधिकार सरकार हा अध्यादेश काढणार

हॉलीवूड स्टायलिस्ट इल्या व्हॅन्झाटो यांनी शैलीबद्ध केलेला हा कॉस्च्युम अजून जास्त या गोष्टीने खास झाला.
उल्लेखनीय म्हणजे, क्रिस्टीना लिलियाना नोव्हा, पाओला झुरिटा, स्टेफानिया ख्रिश्चन, तान्या घावरी, जोसेफिन स्क्राइव्हर, मासूम मिनावाला, हेली शाह, सोनिया बेन आमेर, क्रिस्टीन क्विन आणि बरेच काही यासह प्रसिद्ध हॉलिवूड आणि बॉलीवूड व्यक्तिमत्त्वांच्या पंक्तीत सनी लिओन सामील झाली.  गेमी मालोउफ ( Gemy Maalouf ) आणि बिसीबीजीमॅक्सअझीरिया ( BCBGMAXAZRIA ) च्या आयकॉनिक डिझाईन्सचे प्रदर्शन केले.

मनोरंजनाच्या जगात सनी लिओनीची चढाई काही कमी नाही आणि तिचे एकनिष्ठ चाहते भारतात “केनेडी” च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. तिच्या आगामी प्रोजेक्ट्स मध्ये अनेक गोष्टी आहेत आणि त्या लवकरच सगळ्या समोर येणार आहेत.सनी तिच्या प्रतिभा आणि अतुलनीय करिष्माने जगभरातील प्रेक्षकांना मोहित करत आहे.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?