ICC च्या निर्णयावर माजी क्रिकेटपटूचे वादग्रस्त विधान, भारत-पाक मॅचसाठी बॉर्डरवर स्टेडियम बांधले तरी…

0
8

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. गुरुवारी समोर आलेल्या माहितीनुसार, टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपले सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळणार आहे. भारतीय संघाने यापूर्वीच पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. त्याचवेळी पाकिस्तान 2027 पर्यंत आयसीसी स्पर्धांसाठी भारत दौऱ्यावर जाणार नाही. भारतापाठोपाठ पाकिस्तानी संघही क्रिकेट खेळण्यासाठी भारतात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे माजी खेळाडू आणि क्रिकेट तज्ज्ञांची वक्तव्ये समोर येत आहेत.

भारत-पाक सीमेवर स्टेडियम बांधा

भारतीय संघाने 2008 मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. तर पाकिस्तानी संघ शेवटचा 2023चा एकदिवसीय वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात आला होता. दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे दोन्ही देशांचे क्रिकेट संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर येतात. भारत वर्षानुवर्षे आपला संघ पाकिस्तानात पाठवण्यास नकार देत आहे, पण आता पाकिस्ताननेही तेच केले आहे. यावर पाकिस्तानी क्रिकेटपटू अहमद शहजाद म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर स्टेडियम बांधले पाहिजे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

अहमद शहजाद काय म्हणाला?

अहमद शहजादने पुढे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि भारत सरकारवर निशाणा साधला. अहमद शहजाद यांनी नादिर अली पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, दोन्ही देशांच्या सीमेवर स्टेडियम बांधले पाहिजे. त्यातील एक गेट भारतात आणि एक पाकिस्तानात उघडले. भारतीय खेळाडू तेथून येऊ शकतात आणि आमचे खेळाडू येथून जाऊ शकतात. पण यामुळे बीसीसीआय आणि भारत सरकारला अडचणी येतील. ते म्हणतील की जेव्हा तुमचा खेळाडू आमच्या बाजूला मैदानात येईल तेव्हा आम्ही त्याला व्हिसा देणार नाही.

33 वर्षीय अहमद शेहजाद एकेकाळी पाकिस्तानचा स्टार खेळाडू होता. मात्र, लवकरच त्यांची कारकीर्द संपली. त्याला एकेकाळी ‘पाकिस्तानचा विराट कोहली’ म्हटले जायचे. मात्र तो वर्षानुवर्षे पाकिस्तानी संघापासून दूर आहे. 2017 मध्ये तो शेवटचा एकदिवसीय आणि कसोटी खेळला. शहजादने तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानसाठी 150 हून अधिक सामने खेळले आहेत.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ‘हे’ संघ खेळणार

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश असेल.