कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयात आमदार रविंद्र धंगेकर यांची बैठक

0
1

प्रभाग क्रमांक १५,१६,२९, मधील समस्या व अडचणी बद्दल आज दिनांक २४/०५/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता कसबा, विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय येथे मा.आ.रविंद्रभाऊ धंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयचे प्रमुख अधिक्षक व सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते

यावेळी सर्व पक्षांचे पदाधिकारी,संस्थेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी नागरिकांनी ड्रेनेज लाईन बाबतीत, झाडाच्या फांद्या काढणे, रस्त्यावरील खड्डे, कचरा गोळा करणे या विषयी तक्रार केली,पुण्यात पालखीच्या आगमन होत असल्याने वारकऱ्यांना सोयी सुविधा कशा उपलब्ध करता येईल यावर बैठकीत चर्चा झाली,यावर आमदार रविंद्रभाऊ धंगेकर व क्षेत्रीय अधिक्षक यांनी आपल्या सर्व तक्रारीचे निवारण होईल अशी ग्वाही दिली, आभार सुधिरभाऊ काळे यांनी मानले..

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार