‘नवरत्न तेल’, ‘बोरोप्लस क्रिम’ ही सौंदर्यप्रसादने नाही तर Drugs?

0

तेलंगणा उच्च न्यायालयाने हिमानी नवरत्न तेल, बोरोप्लस अँटी सेप्टीक क्रिम, बोरोप्लस प्रिंकली हीट पावडर, हिमानी निरोगी दंत मंजन लाल, सोना चांदी च्यवनप्राश यासारखे प्रोडक्ट कॉस्मेटिक आहेत की ड्रग्ज यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. म्हणजेच वरील सहा प्रोडक्ट सौंदर्यप्रसादने आहेत की औषधे याबद्दलचा निकाल द्विसदस्यीय खंडपीठाने दिला आहे. या खंडपिठामध्ये न्या. सॅम कोशे आणि न्या. एन. तुकारामजी यांचा समावेश होता.

प्रकरण काय?

हिमानी निरोगी दंतम मंजनला आपण कॉस्मेटिक म्हणून शकतो असं कोर्टाने म्हटलं आहे. हिमानी सोना चांदी च्यवनप्राश, नवरत्न हेअर ऑइल, हिमानी गोल्ड टर्मरिक आयुर्वेदिक क्रिम, बोरोप्लस अँटी सेप्टीक क्रिम, बोरोप्लस प्रिंकली हीट पावडर हे सारे प्रोडक्ट ड्रग्ज म्हणजेच औषध असल्याचा निर्वाळा कोर्टाने केला आहे. आंध्र प्रदेश जनरल सेल्स टॅक्स (एपीजीएसटी) कायदा 1957 अंतर्गत हे सर्व प्रोडक्ट कॉस्मेटिक आहेत की ड्रग्ज आहेत याबद्दलचा निकाल कोर्टाने दिला आहे. सेल्स टॅक्स अपिलेट ट्रेब्युलंट (एसटीएटी) आणि हिमानी लिमिटेड यांच्यामध्ये करासंदर्भातील वादातून हे प्रकरण कोर्टात गेलं होतं. त्यावरच कोर्टाने हा निकाल दिला आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

नेमकं म्हणणं काय?

एसटीएटीने नवरत्न तेल, गोल्ड टर्मरिक आयुर्वेदिक क्रिम, निरोगी दंत मंजन लाल हे कॉस्मेटिक्स असल्याचा दावा केला होता. तर अन्य तीन प्रोडक्ट बोरोप्लस अँटी सेप्टीक क्रिम, बोरोप्लस प्रिंकली हीट पावडर आणि सोना चांदी च्यवनप्राश हे ड्रग्ज प्रकारात मोडतात असा दावा केलेला. एसटीएटीने याचसंदर्भात कोर्टात दावा करताना जीसीएसटी कायदा आणि टीजीएसटी कायद्यानुसार या प्रोडक्टवर 20 टक्के जीएसटी आकरला जावा असं एसटीएटीने म्हटलं होतं. मात्र हिमानीने पहिले तीन प्रोडक्ट ड्रग्ज नसल्याचा दावा करत त्यावर 10 टक्के जीएसटी आकारला जावा असं म्हटलेलं.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

कोर्टाने काय सांगितलं?

कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेत, प्रोडक्टचे गुणधर्म पडताळून पाहिले. कोर्टाने हिमानी सोना चांदी च्यवनप्राश हे 52 वेगवेगल्या वनस्पती आणि मिनरल्सपासून बनवलं आहे ज्यामध्ये सोनं, चांदी, केशरचा समावेश असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचं नमूद केलं आहे. कोर्टाने यासंदर्भात काही आयुर्वेदिक संदर्भ दिले. अर्जदारांनी ड्रग्ज आणि कॉस्मेटिक कायदा 1940 अंतर्गत परवाना घेतल्याची आठवण कोर्टाने करुन दिली. या कायद्यानुसारच एसटीएटीने या प्रोडक्टला ‘कॉस्मॅटिक’ आणि ‘ड्रग्ज’ प्रकारामध्ये विभाजित करुन त्याला ‘ड्रग्ज’ हा दर्जा दिला. सेक्शन 3 (ब) अंतर्गत ड्रग्ज म्हणजे औषध अशा गोष्टीला म्हणतात ज्याचा वापर अंतर्गत किंवा बाह्य अवयवांवर केला जातो. ज्याच्या मदतीने रोग किंवा विकारांचे निदान करणे, उपचार करणे, त्याचा प्रभाव कमी करणे किंवा त्याला प्रतिबंध करणे यासारख्या गोष्टी अपेक्षित असतात, असं कोर्टाने सांगितलं. याच आधारे कोर्टाने निकाल दिला. म्हणजेच कराचा विचार केल्यास या प्रोडक्टकडे केवळ सौंदर्य प्रसादने म्हणून न पाहता औषधं म्हणून पाहिलं पाहिजे असं कोर्टाचं म्हणणं आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा