आज पतित पावन संघटने तर्फे पुणे रेल्वे स्टेशन वर प्रवाशांची होणारी गैरसोय आणि लूट या बाबत वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक आधिकारी पुणे डिव्हिजन (Senior DCM) यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पतित पावन संघटनेचे कॅन्टोमेंट विभाग प्रमुख नरसिंग कोळी यांनी या विषयाकडे लवकरात लवकर लक्ष्य घालून योग्य ती कार्यवाही करून नागरिकांना होणार त्रास थांबवावा अन्यथा संघटनेच्या प्रथेप्रमाणे आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला.
यावेळी पतित पावन संघटना प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील तसेच शहराचे संतोष शेडगे,गुरू भाऊ कोळी उपस्थित होते.