मविआत ‘भावा’वरून ‘मोठा’ वाद; काँग्रेस बैठकीतली Inside Story ही आमची परंपरा….

0
1

महाविकासआघाडीमध्ये मागच्या काही दिवसांपासून मोठा भाऊ आणि छोटा भाऊ वरून मोठा वाद सुरू आहे. काहीच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस मोठा भाऊ असल्याचं विधान केलं होतं, त्याचे पडसाद काँग्रेसच्या बैठकीतही उमटले आहेत. मित्रपक्षाने छोटा, मोठा असं भाष्य करू नये, असा ठराव काँग्रेसच्या बैठकीत मांडण्यात आला आहे.

महाविकासआघाडीमध्ये आधीच जागावाटपावरून वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीसाठी समसमान म्हणजेच प्रत्येकी 16-16-16 जागांच्या फॉर्म्युलाचा प्रस्ताव ठेवला, पण ठाकरे गट मात्र कमीत कमी 18 जागा लढण्यावर ठाम असल्याचं सांगण्यात येत आहे. संजय राऊत यांनीही लोकसभेमध्ये आमचे 18 खासदारच राहतील, अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी तसंच ठाकरे गटाकडून मात्र जागावाटपाचा असा कोणताही फॉर्म्युला मांडला गेला नसल्याचं स्पष्ट करण्यात येत आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

मोठा भाऊ कोण?

‘आपण महाविकासआघाडीचे घटकपक्ष आहोत. महाविकासआघाडी मजबूत ठेवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. पण तुमची जास्त ताकद असेल तर तुम्हाला महत्त्व दिलं जाईल. याआधी प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जागा आपल्यापेक्षा जास्त असायच्या. आम्हाला बार्गेनिंग करताना लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यायला लागायची. आता आम्ही काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत, कारण ते 44 आहेत आम्ही 54 आहोत आणि उद्धव ठाकरेंची सेना 56 होती’, असं अजित पवार म्हणाले होते.

अजित पवारांच्या या विधानावर संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली होती. मधल्या काळामध्ये शिवसेना-भाजप युतीमध्ये देखील कोण लहान भाऊ, मोठा भाऊ हा विषय आला होता. एकदा सगळ्यांची डीएनए टेस्ट आम्ही करू, असा टोला संजय राऊतांनी लगावला होता. प्रत्येक जण आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो, आपापल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ही भूमिका मांडावी लागते, असं संजय राऊत म्हणाले होते.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

नानांचा टोला

आम्ही मोठे होतो तेव्हा कधीच गर्व केला नाही, कधीच सांगितलं नाही. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा आमच्यात आहे. कुणी गर्व करावा, हा त्यांचा अधिकार आहे, त्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला