दिल्ली कॅपिट्ल्सला विजयानंतर आनंदाची बातमी, टीममध्ये माजी वर्ल्ड कप कॅप्टनची एन्ट्री

0

स्टार खेळाडूची एन्ट्री दिल्ली कॅपिट्ल्सच्या गोटात स्टार खेळाडूची एन्ट्री झाली आहे. या माजी कर्णधार राहिलेल्या खेळाडूच्या नेतृत्वात टीम इंडिया वर्ल्ड कप उपविजेता राहिली आहे.

टीम इंडियाला अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये फायनलपर्यंत पोहचवणाऱ्या प्रियम गर्ग याची एन्ट्री झाली आहे. कमलेश नागरकोटी हा आयपीएलच्या या मोसमातून बाहेर पडला आहे. त्यामुळे नागरकोटी याच्या जागी गर्ग याला संधी मिळाली आहे.नागरकोटीच्या जागी खेळाडू घेण्यासाठी गर्ग आणि अभिमन्यू इश्वरन या दोघांना टेस्टसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र गर्गने यात बाजी मारली आणि जागा निश्चित केली. प्रियम गर्ग याआधी आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळला आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

स्पोर्ट्सकीडाच्या रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिट्ल्सने शुक्रवारी प्रियमला आपल्या जोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती विश्वसनीय सू्त्रांनी दिली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

सनरायजर्स हैदराबादने गर्ग याला अंडर 19 वर्ल्ड कपमधील कामगिरीच्या आधारावर 1 कोटी 90 लाख रुपये मोजून आपल्यात घेतलं. गर्गने आतापर्यंत 17 डावांमध्ये 15.69 च्या सरासरीने आणि 115.14 च्या स्ट्राईक रेटने 251 धावा केल्या आहेत.गर्ग पहिले 2 वर्ष हैदराबादमध्ये होत होता. मात्र त्यानंतर फ्रँचायजीने 2022 मध्ये गर्गला रिलीज केलं होतं. त्यानंतर गर्गला 20 लाख या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं. यानंतर गर्ग 2023 मध्ये अनसोल्ड राहिला.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

दरम्यान दिल्ली कॅपिट्ल्स एकमेव विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये तळाशी आहे. दिल्ली कॅपिट्ल्सची 6 सामन्यात एकमेव विजय तर 5 पराभव अशी सद्यस्थिती आहे. दिल्ली आपला आगामी सामना हा 24 एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळणार आहे.