सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणात अजित पवार एकदम स्पष्ट बोलले की…..

0

निलेश घायवळ प्रकरण आणि त्याचा बंधु सचिन घायवळला दिलेल्या शस्त्र परवान्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यावर अजित पवार बोलले आहेत. “यामध्ये मी स्वत: सीपीना सांगितलेलं आहे, कोण कुठल्या गटाचा, पक्षाचा, कोणाच्या जवळचा कार्यकर्ता, कोणाबरोबर फोटो आहे असलं काही पाहू नका. जर चूक असेल, जर कोणी कायदा हातात घेत असेल, नियमांची पायामल्ली करत असेल, तर कारवाई करा. जरी काहींनी शिफारस केली असली, तरी इथल्या सीपींनी त्यांना शस्त्र परवाना दिलेला नाही, असं मला आयुक्तांनी सांगितलं आहे” असं अजित पवार म्हणाले.

“मी आयुक्तांना सांगितलय पुण्यात किंवा महाराष्ट्रात कुठेही कायदा-सुव्यवस्था ठेवणं हे सरकारच काम आहे. मी कोणाकडून राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकत्र होतो, त्यावेळी हा विषय निघालेला. त्यावेळी हीच भूमिका मांडली. अजिबात कोणाची फिकिर करायची नाही. ज्यांनी कुठे चूका केलेल्या असतील, त्यांच्यावर रीतसर कारवाई करायची, चौकशी करुन जे दोषी असतील त्यांच्यावर पुढची कारवाई होणार” असं अजित पवार म्हणाले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

मोबाइलने व्हिडिओ काढले जातात

“आता मी इथे आलोय. अनेक लोक येतात बरोबर, फोटो काढतात. आपल्याला माहित नसतं कोण कसं काम करतय. अलीकडे मोबाइल आलेले आहेत. मोबाइलने व्हिडिओ काढले जातात, सेल्फी काढल्या जातात. हे सर्व करताना संबंध असतो असं नाही. पण चौकशी करताना फोन संभाषणाचे पुरावे अशा या सगळ्या गोष्टी आढळल्या, तर कारवाई केली पाहिजे” असं अजित पवार म्हणाले

मला कळल्यावर मी संध्याकाळी काढून टाकलं

“माझं एवढच मत आहे, राज्याच्या प्रमुखांशी मी बोललो आहे. दहा-बारा वर्ष झाली असतील, आझम पानसरे तेव्हा पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष होते. चुकीच्या व्यक्तीला प्रवेश दिलेला. मला कळल्यावर मी संध्याकाळी काढून टाकलं. मी जाहीर भाषणात सांगतो, तुमच्यावर अन्याय झाला असेल, तर तुमच्यासाठी मी सर्वस्व पणाला लावेन. पण तुमचे हात कुठे खराब असतील, तर तुम्हाला पाठीशी घालणार नाही” असं अजित पवार म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

अधिकाऱ्यांनी काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या असतात

“सगळी चौकशी करायला सांगितली आहे. कोणी पासपोर्ट दिला? शस्त्र परवाना दिला नाही असं सीपीचं म्हणणं आहे. कोणाचा दबाव होता, काय याची चौकशी होईल. कोणी शिफारस केली असली, तरी शहानिशा करणं पोलिसांच काम आहे. मी 35 वर्ष राजकीय जीवनात काम करतोय. एखाद्या गोष्टीला रिमार्क मारला, तर त्यावेळेस अधिकाऱ्यांनी काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या असतात” असं अजित पवार म्हणाले.