पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

• सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांची नियुक्ती • ५ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधी या हरकती व सूचनांवर सुनावणी

0
322

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आज एका दिवसात ७८५ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. गेल्या १० दिवसात केवल ५९५ हरकती व सूचना नोंदविल्या गेल्या होत्या. पण एका दिवसात त्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त हरकतींचा पाऊस आज पडला आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २२ ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. त्यानंतर ४ सप्टेंबर पर्यंत यावर हरकती सूचना नोंदविण्याची मुदत आहे. यासाठी महापालिकेच्या निवडणूक शाखेच्या कार्यालयासह १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

या प्रारूप प्रभाग रचनेवर विरोधक खूष नाहीतच, पण राज्यातील सत्ताधारी असणारे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी व इच्छुकही अवस्था आहेत. ही प्रभाग रचना केवळ भाजपच्याच फायद्याची झाली आहे असा या सर्व राजकीय पक्षांचा आरोप आहे. नागरिकांनी या प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला आहे. प्रभाग भौगोलिकदृष्ट्या मोठा झाल्याने लांबचे क्षेत्रीय कार्यालय देऊ नये, प्रभागाचे नाव बदलावे अशी त्यांची सूचना आहे. पण प्रत्यक्षात निवडणूक शाखेकडे हरकती सूचना नोंदविण्याचे प्रमाण खूप कमी होते.

सोमवारपर्यंत (ता. १) महापालिकेकडे केवळ ५९५ हरकती आल्या होत्या. ही मुदत ४ सप्टेंबरपर्यंतच असल्याने हा आकडा कमी होता. पण आज (ता. २) हरकती व सूचनांची संख्या एकदम वाढून १ हजार ३८२ इतकी झाली आहे. एका दिवसात ७८५ हरकती व सूचना नोंदविल्या गेल्या आहेत. यामध्ये आज सर्वाधिक हरकती या प्रभाग क्रमांक ३ विमाननगर-लोहगाव मधून ३७०, प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे वडगाव बुद्रकमधून १२५ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

शेवटचे दोन दिवस शिल्लक

हरकती सूचना नोंदविण्यासाठी बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवसच शिल्लक आहेत. विरोधीपक्षांसह महायुतीतील घटक पक्षांकडून पुढील दोन दिवसात हरकती नोंदविण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

सुनावणी घेण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती-सूचना नोंदविण्यासाठी राज्य सरकारने प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पुणे महापालिकेसाठी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांची नियुक्ती केली आहे. ५ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधी या हरकती व सूचनांवर सुनावणी घेतली जाणार आहेत.