काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप; माजी आमदाराच्या घरावर दगडफेक करणाऱ्यांचा गोंधळ सुरुच

0
1

बापूजी नगर येथे काही तरुणांनी ज्येष्ठ नेते माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर हे घरी नसताना त्यांच्या घरावर दगडफेक केली. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री सुमारे सात ते साडेसातच्या दरम्यान हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या घरावर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नरसय्या आडम हे सोलापूर शहर मध्य विधानसभेचे उमेदवार आहेत. माझ्या जीवाला धोका असून समाजामध्ये असे उपद्रव करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करा असे ते म्हणाले. नरसय्या आडम आणि काँग्रेसमध्ये शहर मध्यच्या जागेवरून रस्सीखेच सुरु होती. मात्र महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेस सोडली नाही त्यामुळे नरसय्या आडम हे माकपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या वादातून हा सर्व प्रकार घडला असण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

ही बातमी माकपचे कार्यकर्ते ॲड. अनिल वासम यांना या भागातील नगरसेविका आणि नरसय्या आडम यांच्या पत्नी कामिनीताई आडम यांनी फोनवर कळविले असता अनिल वासम हे तात्काळ आडम मास्तर यांच्या घराजवळ पोहोचले. त्यावेळी येथे प्रचंड गोंधळ व बाचाबाची चालली होती. यानंतर अनिल वासम यांनी ११२ क्रमांकावर फोन लावून पोलिसांना ही बातमी कळवली. सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी तात्काळ त्या ठिकाणी काही पोलिसांना पाठवले असता त्यावेळी दगडफेक करणाऱ्या युवकांचा तेथे गोंधळ सुरु होता. अनिल वासम आणि अन्य काही जणांनी तो गोंधळ रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याचे ॲड. अनिल वासम यांनी सांगितले.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

दगडफेक का केली अशी विचारणा केली असता ॲड. अनिल वासम यांनाही धक्काबुक्की झाली. त्यानंतर संबंधितावर कडक कारवाई करण्याचे काम सुरू केले. त्यावर जेष्ठ नेते मास्तर यांना ही बाब समजताच प्रचंड संतापले. माझ्या जीवाला धोका असून समाजामध्ये असे उपद्रव करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नरसय्या आडम मास्तर यांनी केली.