गावगुंडांकडून ड्युटीवरून घरी जाताना PSI वर जीवघेणा हल्ला; हटकल्याचा राग डोक्यात दगडाने मारहाण गेला

0
1

नाशिकमध्ये पोलिसावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या पंचवटी येथे ही घटना घडली. ड्युटीवरून घरी जात असताना पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये पोलिस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरात गुंडगिरीने कळस गाठला आहे. पंचवटीमध्ये पोलीस उपनिरीक्षकांना मारहाण करण्यात आली आहे. पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले प्रकाश नेमाने या पोलिस उपनिरीक्षकांवर सोमवार रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. प्रकाश नेमाने कर्तव्यावरून घरी जात असताना ही घटना घडली.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

पोलिस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने कामावरून घरी जात असातना त्यांनी काही गावगुंडांना हटकवले. त्यामुळे या गावगुंडांना त्ंयाचा राग आला. त्यामुळे त्यांनी थेट नेमाने यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. गवागुंडांनी दगडाने त्यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये प्रकाश नेमाने हे गंभीर जखमी झाले आहेत. नेमाने यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निवडणुकीच्या काळात थेट पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला झालल्याने नाशिक शहरातील गुन्हेगारीची चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.