मालपाणी इस्टेटचा ‘पाषाण’प्रकल्प बेकायदेशीर? प्रशासनाची दिशाभूल ‘भागीदारी’चा गैरवापर जागा मालकांची मोठी फसवणूक

0

पुणे : पाषाणमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मालपाणी इस्टेट चा पाषाण मधील सर्वे नंबर १३०/२, १३०/३, १३०/४, १३०/५ मधील  M Soul Strings  हा प्रकल्प कायदेशीर बाबींच्या मुळे अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे महापालिका बांधकाम विभाग अधिकारी यांनी मुंबई प्रातिक अधिनियमाचा गैरवापर नियमांचे उल्लघन करून ले -आउट मंजूर करण्यात आला आहे. बाणेर पाषाण लिंक रोड परिसरामध्ये मालपाणी इस्टेटच्या वतीने भव्य गृह प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी तानाजी रामचंद्र निम्हण यांच्या वडिलोपार्जित वहिवाटीची जागा त्यांची परवानगी न घेता घेण्यात आली असल्याचे तानाजी निम्हण यांनी प्रकल्पाबाहेर फलक लावून जाहीर केले आहे.

पुणे महापालिका बांधकाम विभागाने कमेन्नसमेंट सर्टिफिकेट सिसी/२५५८/२३ दिनांक ११/१/२०२४ रोजी आराखडा मंजूर करून दिला आहे. सदरील मिळकतीत आमचा वडिलोपार्जित मालपाणी इस्टेटच्या M Soul Strings या गृह प्रकल्पासाठी  पुणे महापालिकेला बनावट दस्ताच्या आधारे तानाजी रामचंद्र निम्हण यांची परवानगी न घेता मालपाणी व इतर काही जणांनी पालिकेची बांधकाम परवानगी मिळवली आहे. एस सी एन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ही (, सोनिग्रा व माजी मंत्री कै. चंद्रकांत छाजेड यांचे पुत्र आनंद छाजेड, तानाजी निम्हण) यांची भागीदारीतील बांधकाम कंपनी 2005 साली सुरू करण्यात आली होती. कंपनी स्थापन करताना घातलेल्या अटी शर्ती यांचे पालन न करतात तानाजी निम्हण यांची वडिलोपार्जित जागा त्यांची परवानगी न घेता व मोबदला न देता मालपाणी इस्टेटला देण्यात आली.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

वडिलोपार्जित जागा देण्याचे अधिकार नसताना कायदेशीर बाबींचे संगनमताने उल्लंघन करत एस सी एन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने भागीदार तानाजी निम्हण यांची मोठे आर्थिक फसवणूक झाली असल्याची बाब समोर आली आहे. पाषाण बागेतील मोक्याच्या ठिकाणी सुरू असलेल्या प्रकल्पात वाढीव बांधकाम मिळण्यासाठी एस सी एन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स च्या वतीने पूर्वी केलेल्या प्रकल्पांचे एकत्रीकरण (अमलगमेशन), जुन्या सभासदांच्या अतिरिक्त टीडीआर चा गैरवापर, मंजूर प्लॅनमध्ये पालिकेची दिशाभूल करून मुख्य रस्ता प्रकल्पालगत असल्याची चुकीची माहिती देण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या वतीने योग्य दखल न घेतल्यास या भागामध्ये लाखो स्क्वेअर फुटचे बेकायदेशीर बांधकाम झटपट विकून मोठी आर्थिक उलाढाल करून ‘मालपाणी’कमावण्याची मानसिकता संबंधित व्यावसायिकाची दिसत आहे. मुळ मालकाची कोणत्याही प्रकारची सही संमती न घेता मालपाणी इस्टेट यांनी चालविलेले बेकायदेशीर व्यवहार करण्याच्या तयारीत असल्याने सदरील बेकायदेशीर व्यवहार हे वरीत थांबविण्यात यावेत. कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात असल्यामुळे मालपाणी इस्टेटचा बाणेर पाषाण लिंक रस्त्यावरील M Soul Strings बांधकाम प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

मुळ मालक व कुटुंबियांची कोणत्याही प्रकारची सही समती न घेता केलेले दस्त अथवा व्यवहार नियमबाहय ठरविण्यात यावेत सदर मिळकतीबाबत मे न्यायालयात प्रकरण प्रलंबीत असेपर्यंत मिळकतीबाबतचे कोणतेही व्यवहार हे मालपाणी इस्टेट यांनी करू नयेत अशी त्यांना समज देण्यात यावी अशी लेखी मागणी पुणे पोलीस आयुक्त व पुणे महापालिका आयुक्त यांना जागामालक यांनी केली आहे.