राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. यासंदर्भात राजकीय पक्षांकडून बैठकांचं सत्रही सुरु झालं आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक घेण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. अशातच आता या निवडणुका कधी आणि किती टप्प्यात होणार यासंदर्भातील माहितीही पुढे आली आहे.






सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता आहे. तीन टप्प्यात या निवडणुका होणार असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगानेही नियोजनही सुरु केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर डिसेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. याशिवाय जानेवारीमध्ये मुंबईसह राज्यातील सर्व महानगर पालिकेचा निवडणूक होईल असं सांगितलं जातं आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीबाबत नाराजीही व्यक्त केली. तसेच न्यायालयाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला वेळेत निवडणुका घेण्यास खडसावले.
Local Body Electionsमहत्त्वाचे म्हणजे यापुढे या निवडणुकांसाठी मुदतवाढ देणार नाही, असंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे आता राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समितींच्या रखडलेल्या निवडणुका जानेवारीच्या ३१ तारखेपूर्वी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.













