प्रदीप कुरूळकरनंतर आणखी एक अधिकारी पाकिस्तानी हनीट्रॅपमध्ये पुरवली गोपनीय माहिती…फेसबूकवर झाली ओळख

0
5

गेल्या वर्षी पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक प्रदीप कुरुलकर यांनी हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती पुरविल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता आणखी एक अधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकल्याचं पुढे आलं आहे.त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रविंद्र कुमार असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. तो उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील ऑर्डिनन्स फॅक्ट्रीचा इंचार्ज असल्याची माहिती आहे. रविंद्र कुमारने ऑर्डिनन्स फॅट्रीशी संबंधित महत्त्वाची आणि गोपनीय कागदपत्रे पाकिस्तानी एजंटला पुरवली आहे. याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने त्याला गुरुवारी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

”गेल्या काही दिवसांपासून ऑर्डिनन्स फॅक्ट्रीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पैसे देऊन त्यांच्याकडून गोपनिय माहिती मिळवली जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही कारवाई केली असता रविंद्र कुमार यांनी पाकिस्तान एजंटला माहिती पुरवल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे त्याला आम्ही अटक केली आहे”, असं दहशतवाद विरोधी पथकाकडून सांगण्यात आलं आहे.

या अटकेनंतर रविंद्र कुमारला लखनऊ येथे आणण्यात आलं असून त्याची कसून चौकशी केली जाते आहे. या दरम्यान त्याच्या फोनमध्ये ऑर्डिनन्स फॅक्ट्रीशी संबंधित काही गोपनीय दस्तऐवज आढळून आली आहेत. याबाबत विचारलं असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, त्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला आहे.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

”मी २००९ पासून या ऑर्डिनन्स फॅक्ट्रीचा इंचार्ज म्हणून काम करतो आहे. जुलै २०२४ मध्ये फेसबूकवर माझी ओळख नेहा शर्मा या मुलीची झाली. आम्ही व्हॉट्सअॅपवर बोलायचो. यादरम्यान, मी ही कागदपत्रे तिला पाठवली”, असं त्याने त्याच्या कबुलीजबाबात म्हटलं आहे.