चांदणी चौक एक फसलेला प्रयोग! स्थानिक सूचनांना वाटण्याच्या अक्षदा; ‘करोडो’ खर्च तरी मनस्ताप, वाहतूक कोंडी अन् तुडुंब डबके

0

कोथरूड : कोथरूडमधील वाढते अपघात आणि चांदणी चौकशी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुमारे 1000 कोटी रुपये खर्च करून चांदणी चौकात उड्डाणपुले अन् नागमोडी वळणे बांधण्यात आली परंतु स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या अनुभवाच्या सूचनाला तंत्रज्ञानाच्या नावाने वाटण्याचा अक्षदा लावल्यामुळे पुन्हा स्थानिक लोकांना ‘मनस्ताप’सहन करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही. चांदणी चौकातील घाईच्या कामांमध्ये वरिष्ठ पातळीवरून लक्ष दिल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मूळ मूलभूत सूचनांना वाटण्याच्या अक्षदा लावण्याला प्राधान्य दिले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार या ग्लॅमर नेतृत्वाबरोबरच चर्चा करण्यास प्राधान्य दिल्यामुळे या भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा अन्य रस्त्यांची कनेक्टिव्हिटी आणि उतार करताना दिशाहीन नियोजन केल्यामुळे आज चांदणी चौक एक फसलेला प्रयोग! अशी चर्चा सुरू झाली आहे तर वरून डोंगरावरून भले मोठे पाण्याचे लोट भुसारी कॉलनीतील सोसायटीमध्ये घुसत असल्याने स्थानिक नागरिकांना मनस्ताप करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

चांदणी चौक चे थाटामाटात उद्घाटन झाल्यानंतरही चांदणी चौकातील अपघाताचे सत्र सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आपली ‘हट्टवादी’ भूमिका सोडत नाही पुणे महापालिका जबाबदारी घेण्यास तयार नाही त्यामुळे ही अपघाताची मालिका बंद होण्याचे नाव घेत नाही. चांदणी चौकाकडून कोथरूडच्या दिशेने जाताना एका (पुणे महापालिकेतील सन्माननीय सदस्य)विशेष व्यावसायिकाला या नव्याने सुरू करण्यात आलेल्या रस्त्याचा थेट संपर्क व्हावा यासाठी सेवा रस्त्याची उंची नियमापेक्षा जास्त ठेवून ‘निष्ठता’ पाळण्यात अधिकाऱ्यांनी धन्यता मारल्यामुळे आज वाहतूक कोंडी आणि सततच्या अपघातांचा सामना स्थानिक नागरिकांना करावा लागत आहे.

चांदणी चौकाच्या उड्डाणपूलाचे भूमिपूजन २०१७ मध्ये झाले होते. दोन- तीन वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु आता सहा वर्षांनी आगामी २५ वर्षांचा विचार करून चांदणी चौक 6 वर्षांनी १२ ऑगस्ट रोजी उद्घाटन करताना उड्डाणपुलाचा आराखडा ‘आयआयटी’ मुंबईकडून तयार करून घेतला आहे. तज्ज्ञ संस्थांकडून तपासून घेतला. पुढच्या २५ वर्षांचा विचार करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे असे भूमिपूजन प्रसंगी गडकरी यांनी सांगितले होते. परंतु उद्घाटनानंतर या भव्यदिव्य आराखड्याच्या समस्या स्थानिक नागरिकांना जाणू लागल्या. पुलाच्या कामासाठी सुमारे २७ हेक्‍टर जागेचे संपादन करावे लागले या प्रकल्पामुळे ११६ कुटुंबे बाधित झाली त्यांचे पुनर्वसन केले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

तीव्र उत्तरामुळे मान्सूनपूर्व पावसातच गाड्या घसरण्याच्या प्रकारामध्ये सुरुवात झाली आहे. पावसाळी पाणी जाण्यासाठी कुठलीही कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे रस्त्यावरून पाण्याचे लोट आणि गुडघाभर पाण्यातून सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. या प्रकल्पातील मुख्य चूक म्हणजे बावधनकडून  वारजे ‘सेवा रस्ता’ खंडित झाल्यामुळे या भागातील वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडला आहे. मुख्य पौड रस्ता व नव्याने बांधण्यात आलेल्या चांदणी चौक पुलाखाली वाहतूक कोंडीचा नित्य सामना करावा लागत आहे. याबरोबरच पादचारी मार्ग बनवतानाही कोणताही मार्मिक विचार न घेता फक्त सोयीस्करित्या व्यवसायिकांना फायदा देण्याचे हेतूनेच पादचारी मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार