पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना ताजी असतानाच पुणे शहर पुन्हा हादरले आहे. पुण्यामध्ये १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आलाय. बापानेच आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे.






मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात पुन्हा लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. बापानेच आपल्या १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना पुण्यातील नांदेड सिटी परिसरात घडली आहे. स्वतःच्या १४ वर्षांच्या मुलीवर नराधम बाप ८ महिन्यांपासून बलात्कार करत होता. आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १४ वर्षे वयाची असून आरोपी बापाचे वय ४५ आहे. आरोपीचे पत्नीसोबत भांडण झाल्याने पत्नी विभक्त राहत होती तर घरात १४ वर्षीय पीडित मुलगी आणि आरोपी वडील असे दोघेच राहत होते. मागील वर्षी जुलै महिन्यात आरोपीने मुलीला धमकी देत मारहाण करत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. याबाबत कुठेही वाच्यता न करण्यास सांगत तिला धमकी दिली. त्यानंतर नराधम बाप तिच्यावर सतत बलात्कार करत राहिला.
दरम्यान नोव्हेंबरमध्ये आरोपीची पत्नी घरी परत आली. मात्र पत्नी कामावर गेल्यानंतर त्याने पुन्हा हा प्रकार सुरूच ठेवला. फेब्रुवारीपर्यंत आरोपी स्वतःच्या मुलीसोबत जबरदस्ती करत लैंगिक संबंध ठेवायचा. दरम्यान दोन दिवसांपूर्वी बालहक्क समितीने नांदेड सिटी परिसरात अशा प्रकारचे कृत्य घडत असल्याची माहिती पुणे पोलिसांना दिली होती. त्यानंतर नांदेड सिटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वडिलांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्को कायद्यांतर्गत नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४५ वर्षीय नराधम बापाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. बाल हक्क समितीने हा प्रकार उघडकीस आणला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करत नराधम बापाला शनिवारी बेड्या ठोकल्या. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, पुण्यातल्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये २५ फेब्रुवारीला तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. पुण्यावरून ही तरुणी फलटणला निघाली होती. आरोपी दत्ता गाडेने या तरूणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी ७० तासांनंतर आरोपीला शिरूर येथून अटक केली. आरोपी सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे. आज आरोपीची डीएन चाचणी केली जाणार आहे.











