नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंचा मनसेला धक्का; जाणून घ्या सविस्तर

0

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील चित्र वेगाने बदलत आहे. सत्ताधारी महायुती आपली सत्ता कायम टिकवण्यात यशस्वी ठरली, तर दुसऱ्याबाजूला महाविकास आघाडी कमकुवत होत चालली आहे. काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु आहे. या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सर्वात जास्त ओघ भाजप, शिवसेनेकडे आहे. त्यात उद्धव ठाकरे गटाला सर्वात जास्त गळती लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले. उद्धव ठाकरे गटाचे फक्त 20 आमदार आहेत. सत्ता आणि राजकीय भविष्याचा विचार करुन ठाकरे गटातून बाहेर पडणारे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आहेत.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

आज कोकणातील राजापूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का आहे. कारण राजन साळवी हे कोकणातील मोठे नेते आहेत. मागच्या अनेक निवडणुकीत त्यांनी राजापूर विधानसभेचा गड राखला होता. 2024 विधानसभा निवडणुकीत मात्र, शिवसेना उमेदवार किरण सामंत यांनी राजन साळवींचा पराभव केला. किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधु आहेत. राजन साळवी यांच्या जाण्याने कोकणात ठाकरे गट आणखी कमकुवत होईल.

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

ठाकरे गटातून मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते प्रवेश करत असताना, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आता नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही धक्का दिला आहे. नाशिक हा काही वर्षांपूर्वी मनसेचा गड मानला जात होता. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण आता नाशिकमध्ये मनसेच्या एका माजी नगरसेवकाला शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे.

कोणी केला प्रवेश?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातपूर प्रभाग समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक योगेश शेवरे, उद्धव ठाकरे गटातील तथा नाशिकरोड जेलरोड परिसरातील माजी नगरसेवक पवन पवार आणि काँग्रेस महिला आघाडीच्या नाशिक जिल्ह्याध्यक्षा वंदनाताई पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश झाला. एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी, शिवसेना उपनेते तथा नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय (अप्पा) करंजकर, सहसंपर्क प्रमुख राजू (अण्णा) लवटे, महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे, विक्रम नागरे, अभय महादास आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती