वानखेडे स्टेडियमवर विनोद कांबळीने गावस्करांचे पाय धरले; कांबळीची अवस्था पाहून गावस्करांनी मारली मिठी

0
2

मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडिअमला आता 50 वर्षं पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. 50 व्या वर्धापनदिनाचा मुख्य सोहळा 19 जानेवारीला होणार आहे. पण, त्यापूर्वी रविवारी एमसीएतर्फे मुंबईच्या रणजी कर्णधारांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

वानखेडे स्टेडिअमचा 50 वा वर्धापनदिन

यावेळी सुनील गावसकर, विनोद कांबळी, वसिम जाफर, पृथ्वी शॉ असे अनेकजण या सोहळ्याला उपस्थित होते. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सुनील गावसकर यांना स्मृतीचिन्हही भेट दिलं.

वाखनेडे स्टेडिअमवर विनोद कांबळीची नव्यानं एन्ट्री

वाखनेडे स्टेडिअमवर ज्या खेळाडूंचं क्रिकेट करिअर घडलं, त्या सर्व खेळाडूंनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यात सर्वांचं लक्ष गेलं ते म्हणजे विनोद कांबळी यांच्याकडे. विनोद कांबळी काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत होते. त्यावेळी सचिन तेंडुलकर पासून ते कपील देवपर्यंत अनेकांनी त्याच्यासाठी मदतीचा हात दिला होता.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

दरम्यान त्या आजारातून बरा होऊन विनोद कांबळीला घरी सोडण्यात आलं, त्यावेळी देखील रुग्णालयातले त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर तो आराम करत असल्याचं त्याच्या घरच्यांनी सांगितलं होतं. वाखनेडे स्टेडिअमवर विनोद कांबळीने देखील हजेरी लावली होती. यावेळी तो एकदम फिट अँड फाईन दिसत होता.

गावस्करांच्या आदराने पाया पडला

विनोदने पांढरा शर्ट, ब्लॅक जिन्स आणि त्याचा फेमस गॉगल घातला होता. त्याच्या लूकमुळे तर त्याने सर्वांचं लक्ष वेधलचं पण त्याहीपेक्षा त्याच्या एका कृतीने सर्वांना नक्कीच त्याचं कौतुक वाटलं.

ती कृती म्हणजे विनोद कांबळीने सोहळ्याला उपस्थित असलेल्या सुनील गावस्करांची भेट घेतली. त्यांना पाहाताच थेट कांबळी त्यांच्या पाया पडला.यावेळी त्याला खाली वाकण्यास जमत नसल्याचं देखील दिसतं होते. पण त्याने मित्राचा आधार घेत गावस्करांच्या आदराने पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतला.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

गावस्करांनाही भरून आलं अन् त्यांनी कांबळीला मिठी मारली

कांबळीचे गावस्करांबाबत असलेलं प्रेम आणि आदर पाहता गावस्करांनाही भरून आलं होतं. त्यांनी कांबळीला मिठीही मारली. त्याची गळाभेट घेतली. एवढच नाही तर शिवाजी पार्कवर झालेल्या कार्यक्रमात विनोद कांबळीची अवस्था पाहून सुनील गावस्कर यांनी कांबळीसाठी मदतीचा हात पुढे केला होता.

गावस्करांकडून कांबळीसाठी मदतीचा हात

तसेच गावस्करांनी कांबळीच्या रिहॅब सेंटरसाठी मदतीचं आश्वासन केलं होतं. विनोदला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हा सुनील गावस्करांनी फोन करून कांबळीची विचारपूस देखील केली होती. त्यानंतर आता कांबळीने गावस्करांचे आभार मानले आहेत.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

दरम्यान या सोहळ्यात विनोद कांबळीने सर्वांची भेट घेतली. त्यावेळी पृथ्वी शॉ देखील उपस्थित होता. विनोद कांबळी ने पृथ्वीची भेट घेत त्याला आशीर्वादही दिला. त्यामुळे विनोद कांबळीचे हे बदललेले रुप पाहून सर्वांना त्याचं कौतुक आणि समाधानही वाटलं. तसेच त्याची तब्येत लवकर बरी व्हावी अशी सर्वांनी प्रार्थनाही केली.