रविना टंडनने लेकीला दिलेली भगवद्गीतेतील शिकवण; राशाचं श्रीकृष्णाबदद्लचं वक्तव्य, माय-लेकीच कौतुक

0
1

अभिनेता अजय देवगण याची प्रमुख भूमिका असणारा ‘आझाद’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटात त्याचाच पुतण्या अमन देवगण आणि रविना टंडनची मुलगी राशा यांची जोडी झळकणार आहे. दरम्यान, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. दोघांचीही भूमिका नेमकी कशी असणार आहे हे 17 जानेवारीला चित्रपट रिलीज झाल्यावर समोर येइलच.

रवीनाची लेक राशाने केलेलं वक्तव्य चर्चेत

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमन आणि राशा अनेक मुलाखतींसाठी हजर राहत आहेत. राशाच्या मुलाखतीमधली एक गोष्ट प्रचंड व्हायरल झालेली दिसत आहे. ती म्हणजे भगवद्गीतेचा संदर्भ देऊन रविनाने तिच्या लेकीला दिलेला एक मौल्यवान सल्ला. रवीनाची लेक राशाने केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

रविनाने लेकीला दिला भगवद्गीतेतील एक मौल्यवान सल्ला

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘टिव्ही 9 भारतवर्ष’ मीडियाशी संवाद साधताना राशाने रविनाने तिला दिलेली एक शिकवण सांगितली. ती म्हणाली की,”माझ्या आईने मला एकदा सांगितलेलं. भगवद्गीतेत लिहिलंय की, तुम्ही फक्त खूप मेहनत करा. प्रत्येक कामात तुमचं बेस्ट द्या. पुढे जे काय होईल ते देवावर सोडा. तुमच्यासाठी जे बेस्ट आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. त्यासाठी कोणतीही गोष्ट धरून न ठेवता ती सोडून द्या. चांगले कर्म करत त्याचे चांगलेच फळ तुम्हाला मिळेल.” श्रीकृष्णाने जो सल्ला अर्जुनाला दिला तोच सल्ला कायम आईला लेकीला देत असल्याचं राशा म्हणाली.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

“अतीविचार आणि अनिश्चितता खूप आहे”

एवढच नाही तर पुढे राशाने सांगितले की,” माझी आई म्हणते की, या इंडस्ट्रीत इमोशनल अटॅचमेंट खूप आहे. अतीविचार आणि अनिश्चितता खूप आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाचं ऐकत बसाल तर कायम चिंताग्रस्त राहाल. त्यामुळे तुम्ही तुमची खूप मेहनत करा, तुमचं बेस्ट द्या त्यानंतर देव सर्व काही नीट करेल हा विश्वास कायम ठेवा” असं म्हणतं तिने आईचा हा सल्ला कायम लक्षात ठेवून पुढे चालायचं ठरवल्याचं राशाने सांगितले आहे.

रविनाचे अन् तिच्या लेकीचे नेटकऱ्यांकडून कौतुक

दरम्यान, अजून एका मुलाखतीदरम्यान राशाने भगवद्गीतेचा उल्लेख गोष्टी सांगितल्या होत्या. राशाला भगवद्गीता, त्यातील विचार हे माहित आहे याबद्दल नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं होतं तसेच लेकीला दिलेल्या संस्काराबद्दल रविनाचेही नेटकऱ्यांनी कौतुक केले होते. राशा-अमन-अजय देवगण यांचा ‘आझाद’ हा चित्रपट 17 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे