सरपंच खून प्रकरण सर्वात मोठी अपडेट! ‘मोकारपंती’ ग्रुप कॉलवर 6 जण पाहात होते LIVE मर्डर; सर्व या वयोगटाचे हे धोकादायक

0

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेला आता एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र अजूनही हत्येचा उलगडा झाला नाही.

पोलिसांनी आता कारवाईला वेग दिला असून एकूण 8 जणांना अटक केली आहे. या सगळ्यांची सीआयडी आणि एसआयटीकडून कसून चौकशी केली जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येत आहे.

आता देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्यावेळी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांना मारहाण केली जात होती, त्यावेळी एका आरोपीनं घटनास्थळावरून एक व्हिडीओ कॉल केला होता. व्हिडीओ कॉलवर एकूण सहा लोक होते, जे संतोष देशमुख यांची हत्या लाईव्ह बघत होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी प्रतिक घुले यानं हा व्हिडीओ कॉल केला होता.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

पण आरोपी प्रतिक घुले यानं हा व्हिडीओ कॉल कुणा व्यक्तीला केला नव्हता तर त्याने हा व्हिडीओ कॉल व्हॉट्सअॅपवरील ‘मोकारपंती’ नावाच्या ग्रुपवर केला होता. या ग्रुपमधील सहाजण या व्हिडीओ कॉलवर लाईव्ह होते. या सहाजणांसमोर संतोष देशमुख यांना बेदम मारहाण केली जात होती, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे व्हिडीओ कॉलवर असणारे सर्व सहाजण 17 ते 19 या वयोगटातील होते. आता हे सहाजण कोण होते आणि संतोष देशमुख यांना मारहाण होताना, या ग्रुपवर व्हिडीओ कॉल करण्याचं नेमकं कारण काय होतं, याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस याबाबतचा तपास करत आहेत.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

एक महिन्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात काय घडलं?

6 डिसेंबर

– संतोष देशमुखांचा मस्साजोग पवनचक्कीवर वाद

9 डिसेंबर

– सरपंच संतोष देशमुखांची हत्या

– धनंजय देशमुखांनी केली केजमध्ये तक्रार

– केज पोलिसात 6 जणांविरोधात गुन्हा

10 डिसेंबर

-बीडमध्ये सामान्यांचा रास्तारोको

-जयराम चाटे आणि महेश केदारला अटक

11 डिसेंबर

– क्राईम ब्रांचकडून प्रतिक घुलेला अटक

– वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा

13 डिसेंबर

– बीड जिल्हा बंदची हाक

– देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे

14 डिसेंबर

– केज पोलीस निरीक्षक महाजन सक्तीच्या रजेवर

– विष्णू चाटेची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

18 डिसेंबर

– विष्णू चाटेला अटक

19 डिसेंबर

– देशमुखांच्या शवविच्छेदनात मारहाण झाल्याचं स्पष्ट

21 डिसेंबर

– पोलीस अधीक्षक अविनाश बारगळांची बदली

– नवनीत कॉवत नवे पोलीस अधीक्षक

– शरद पवार,अजित दादांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट

24 डिसेंबर

– खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

28 डिसेंबर

– जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा

31 डिसेंबर

– वाल्मिक कराड सीआयडीला शरण

3 जानेवारी

– डॉ. संभाजी वायबसे, सिद्धार्थ सोनावणेला घेतलं ताब्यात

4 जानेवारी

– सुधीर सांगळे, सुदर्शन घुलेला पुण्यातून अटक

6 जानेवारी

– शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

– धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीयांची राज्यपालांची भेट

7 जानेवारी

-देशमुख कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

-आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार