“जीव घेण्या बेकायदेशीर मांजा विक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय भरारी पथकाची शोध मोहिमेद्वारे दंडात्मक कारवाई

0

नायलॉन मांजाच्या वापरामुळे गेली ६ महिन्यात तरूण दुचाकी स्वारांना व काही पशु पक्षांना आपला जीव गमवावा लागला आहे शिवाय कित्येक पक्षी व मानवाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याची गंभीर दखल पुणे महानगरपालिकेने घेरून भरारी पथकांच्या माध्यमातून मांजा शोध मोहिम घेरून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने “दमदार भरारी पथकाच्या मार्फत प्रभाग क्रमांक १०,११,१२ व नविन समाविष्ठ बावधन गावामध्ये मांज्या शोध मोहिमेद्वारे जय भवानी व्हरायटीज एनडीए पाषाण रोड याठिकाणी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या ४ दुकानदारावर प्रत्येकी ५०००/- रुपये रोख स्वरूपात असे एकूण २०,०००/- (वीस हजार रुपये ) दंडात्मक कारवाई करून शुल्क वसूल करण्यात आले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

कोथरूड भागात भरारी पथकाच्या माध्यमातून मांजा शोध मोहिम सुरू करण्यात आली या माहिमेद्वारे पतंग व मांजा विक्री करणाऱ्या व्यवसायिकांना नायलॉन मांजा किती घातक आहे याविषयी माहिती दिली. शिवाय व्यवसायिकांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नागारिकांनी नोंद् घ्यावी. असे वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे व मोकादम वैजीनाथ गायकवाड यांनी एम. आय. टी. महाविद्यालयाच्या प्रांगणात ” स्वरा झंकार” या संगीत रजनी कार्यक्रमात दोन हजार तरूण नागरिकांना स्वच्छता व मांजा वापरू नका म्हणून शपथ देण्यात आली.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

“स्वच्छ भारत अभियान व सर्वेक्षण मिशन २०२५” च्या अनुषंगाने स्वच्छता अभियानात नागरिकांचा १००% सहभाग वाढवा व पुणे शहराला एक नंबर वर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. शिवाय कोथरूड परिसरातील प्रत्येक व्यवसायिक व नागरिकांना माईकद्वारे ” पतंग महोत्सव साजरा करत असताना जीवघेणा नायलॉन मांजा वापरू नका, मानवी व पशुपक्षांचे जीव धोक्यात घालू नका, साध्या दोऱ्यांचा वापर करा आणि आपल्या प्राणांचे रक्षण करा असे आवाहन करण्यात आले. सदर मांजा शोध मोहिम घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ कार्यालय क्रं. २ चे उपायुक्त अविनाश सकपाळ, महापालिका साहाय्यक आयुक्त विजय नायकल यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक हनुमंत चाकणकर, गणेश चोंधे, सचिन लोहकरे, करण कुंभार, जया सांगडे, रूपाली शेडगे, गणेश साठे, प्रमोद चव्हाण, सुरज पवार, लक्ष्मीकांत कुलकर्णी, संतोष ताटकर मोकादम वैजीनाथ गायकवाड, राम गायकवाड, आण्णा ढावरे, गजानन कांबळे, अशोक कांबळे यांनी परिश्रम घेतले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती