वाल्मिकच्या माध्यमातून बीडमध्ये साखळी पसरली आहे तुम्ही काय पोलीस ऑफिसर आहे का? विजय शिवतारे अजितदादांवरच संतापले

0
1

आवादा कंपनीच्या २ कोटींच्या खंडणी प्रकरणात आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा दुरान्वये संबंध नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. असे वक्तव्य करायला अजित पवार काय पोलीस अधिकारी आहेत काय? असा उद्विग्न सवाल शिवसेना नेते, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला.

शिवसेना नेते, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मस्साजोग येथे जाऊन सांत्वनपर भेट घेतली. या भेटीत घडलेल्या सगळ्या घटनेची माहिती जाणून घेऊन तुम्हाला न्याय मिळेपर्यंत मी आणि शिवसेना पक्ष तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहू, असे विजय शिवतारे यांनी कुटुंबियांना आश्वस्त केले. भेटीनंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

वाल्मिक कराडचे सामाज्र आणि त्याच्यातून झालेली विषवल्ली याविषयी अजितदादांना काहीच का वाटत नाही?

विजय शिवतारे म्हणाले, अन्यायाविरुद्ध लढणारे नेतृत्व म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रेकॉर्ड महाराष्ट्राला माहिती आहे. अजितदादांच्या बाबतीत बोलताना अनेक जण परखड नेतृत्व म्हणून बोलतात. मग सगळ्या महाराष्ट्राला बीडमधील चुकीची गोष्ट वाटत असताना, वाल्मिक कराडचे सामाज्र आणि त्याच्यातून झालेली विषवल्ली याविषयी अजितदादांना काहीच का वाटत नाही? असा सवाल विचारून अजितदादांच्या भूमिकेबद्दल आश्चर्य वाटत असल्याचे शिवतारे म्हणाले.

दादा काय पोलीस अधिकारी आहेत काय?

धनंजय मुंडे यांचा दुरान्वये संबंध नाही, असे अजितदादा म्हणाले. दादा काय पोलीस अधिकारी आहेत काय? असा परखड सवाल शिवतारे यांनी विचारला. धनंजय मुंडे यांच्याबद्दल भूमिका घ्यायची नसेल तर ठीक पण वाल्मिक कराड आणि त्याच्या माध्यमातून बनलेली साखळी याविषयी तरी अजितदादांनी परखड भूमिका घ्यायला हवी, असे शिवतारे म्हणाले.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

बीड प्रकरणावर अजितदादांची भूमिका पाहता शल्य वाटते

अजितदादा देखील कडक स्वभावाचा माणूस आहे. त्यांनी परखडपणे निर्णय घेतले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करताना बीडच्या घटनेवर अजितदादांची भूमिका पाहता शल्य वाटत असल्याचे शिवतारे म्हणाले.

बीडमधील साखळी मोडीत काढण्याची भूमिका तरी अजितदादांनी घ्यावी, सर्वसामान्य माणसांत येऊन अजितदादांनी बोलावे. वाल्मिक कराडच्या माध्यमातून बीडमध्ये साखळी पसरली आहे ती मोडण्याची भूमिका अजितदादांनी घेतली पाहिजे. ती कशी घ्यायची त्यांनी ठरवावं पण सर्वसामान्य माणसांत येऊन अजितदादांनी याबद्दल भूमिका मांडावी, असेही शिवतारे म्हणाले.