हे महायुतीच्या अंगलट येण्याची शक्यता म्हणून ‘स्थानिक’च्या निवडणुकीनंतर या नियुक्त्या इच्छुक ही फळी पुन्हा जुंपली?

0

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक पदाधिकाऱ्यांना महामंडळाचा अमिष दाखवण्यात आलं होतं. महामंडळ समितीवरील अध्यक्ष आणि पदावर इच्छुक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी पायाला भिंगरी बांधून काम केले.मात्र या दोन्ही निवडणुकीच्या निकालानंतर पदाधिकाऱ्यांना या महामंडळ व समितीवरील पदे वाटप होण्याची उत्कंठा लागली होती. मात्र तूर्तास तरी या समित्यांवरील नियुक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पुन्हा अशा इच्छुक पदाधिकाऱ्यांना पुन्हा जुंपले जाणार आहे. एकाला खुश करण्यासाठी दहा जणांची नाराजी ओढून घेण्याचा डाव महायुतीच्या अंगलट येण्याची शक्यता असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतरच महामंडळ व समित्यांवरील नियुक्ती शक्य आहे. 2014 ते 2019 च्या कार्यकाळात युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर काही जणांना महामंडळ आणि देवस्थान समितीवर घेण्यात आले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

मोजक्याच लोकांना संधी देण्यात आल्याने आणि कार्यकर्त्यांची नाराजी पाहायला मिळाली. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नाराजी वाढू नये यासाठी शेवटच्या क्षणी अनेक पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आली. मात्र पदभार स्वीकारण्यापूर्वीच आचारसंहिता लागल्याने या पदाधिकाऱ्यांची नाराजी आणखी वाढली. तर मागील पाच वर्षात समित्यांवरील नियुक्ती रखडली होती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमताने महायुती सरकार निवडून आल्याने महामंडळ आणि समित्यांवरील नियुक्ती होतील अशी अनेक इच्छुक पदाधिकार्‍यांना आशा आहे. त्यामुळे अनेकांनी फिल्डिंग लावली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अशा इच्छुक पदाधिकाऱ्यांना महामंडळ आणि समित्यांवरील पदाचे गाजर दाखवण्यात आले आहे. या दोन निवडणुकीत चांगल्या काम करणार्‍यांना संधी दिली जाईल. अशी नेत्यांना शब्द द्यावा लागला. मात्र आगामी काळात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लागण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

एकाला संधी दिल्यास दहा जण नाराज होतील. त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत फटका बसेल अशी भीती महायुतीतील भाजप (BJP) शिवसेना आणि राष्ट्रवादीला देखील आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्यानंतरच उर्वरित पदाधिकार्‍यांना महामंडळ आणि समित्यांवर नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे.

अनेकांची जोरदार फिल्डिंग

विधानसभा आणि लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर शब्द दिलेल्या पदाधिकार्‍यांनी वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे. विशेषत: इच्छुकांनी आतापासूनच आपली वर्णी लागली या अविर्भावातच समाजात वावरणी सुरू ठेवली आहे. मात्र अध्यक्ष निवड कधी होणार याकडे नजरा लागून राहिल्या आहेत. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतरच या नियुक्त्या होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती