अमित शहाच्या निषेधार्थ शिवडी विभागाच्या वतीने आक्रोश मोर्चा; संविधानप्रेमी सर्व समुहातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी

0

मुंबई दि. २२ (रामदास धो. गमरे) सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ शिवडी गेट क्र. ६, बौद्धजन पंचायत समिती शिवडी विभाग, गटक्रमांक १३, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर व संविधानावर विश्वास, प्रेम व निष्ठा असलेल्या संविधानप्रेमी व आंबेडकरी विचारांचे पाईक असणाऱ्या विविध संघटना व भारतीय नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल लोकसभेत संपूर्ण सभागृहात अनुद्गार काढणाऱ्या मनुवादी, एकेकाळी तडीपार असलेले गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपी व देशाचे विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात तसेच संविधानविरोधी, जातीवादी पार्श्वभूमी असलेल्या परभणी घटना व त्या घटनेत पोलिसांकडून मारहाण करून खून झालेल्या कायद्याचा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याचा खून करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी पक्षविरहीत आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

सदर आक्रोश मोर्चा रविवार दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्तंभ, शिवडी क्रॉस रोड, गेट नं. ६ येथून सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शांततेच्या मार्गाने निघाला, सदर मोर्च्यात कोणत्याही राजकिय पक्षाचे झेंडे, बॅनर न घेता केवळ राष्ट्रध्वज व आंबेडकरी चळवळीचा ज्वलंत इतिहास सांगणारा निळा ध्वज हेच सामील झाले होते. विभागातील सर्व शाखा व संविधानप्रेमी संघटनांनी यात सहभाग घेऊन र.फी.अ.की. कीडवाई मार्ग पोलिस ठाणे येथे मोर्चा नेला व संबंधित पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी संदीप रणदिवे साहेब यांना सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ शिवडी गेट नं. ६ चे अध्यक्ष संजय कसबे, रिपाई अ – मुंबईचे सचिव दिपक गमरे, कामगार नेते राजाराम जाधव, बौद्धजन पंचायत समिती शिवडी विभाग १३ चे कार्याध्यक्ष संतोष दा. जाधव, उबाठा शिवसेनाचे नेते अस्लम खान, समाजवादी पार्टीचे नेते साजिदभाई सिद्धीकी, तहसीलदार शेख, हमीद शेख, नूर शेख, बेस्ट कामगार नेते दिपक वाघ, अभिजित, अंकुश, माजी गटप्रमुख प्रकाश कासे, माजी कोषाध्यक्ष अनंत मोहिते, बबन चंदनशिवे, चिंतामण खैरे, सिद्धार्थ गांगुर्डे, संगीता जाधव, वैशाली कदम, सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचे कार्यकर्ते स्वप्निल आहिरे, अमोल सोनावणे, विशाल जाधव, अनिल माने, विनोद सोनवणे, राहुल इंगळे, आदर्श शिक्षिका महिरे ताई, बौद्धजन पंचायत समिती शिवडी विभाग, गटक्रमांक१३ मधील विविध शाखांचे कार्यकर्ते, महिला मंडळ, तमाम भारतीय संविधान प्रेमी जनता यांनी निवेदन सादर केले. सदर निवेदन सादर केल्यानंतर शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना मुकश्रध्दांजली अर्पण करून सदर मोर्च्याची सांगता करण्यात आली तद्नंतर मोर्च्यात सहभागी तमाम संविधान व आंबेडकर प्रेमी जनता कोणत्याही सरकारी नियमांचे उल्लंघन न करता अत्यंत शांततेत आपापल्या गंतव्यस्थानी मार्गस्थ झाले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन