कोल्हापूर दि. २३ (रामदास धो. गमरे) छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल, जामगे या शाळेच्या माध्यमातून कोल्हापूर येथे आयोजित दहा दिवसीय एनसीसी कॅम्पमध्ये रायफल फायरिंग स्पर्धेत बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर जिल्हा रत्नागिरी या संघाच्या गिमवी विभाग क्र. ३ चे सन्मानिय अध्यक्ष राजेश मोहिते यांचे चिरंजीव मास्टर राज राजेश मोहिते याने गोल्ड मेडल पटकावून आपल्या शाळेचे व विभागाचे नाव उज्वल केले.






मास्टर राज राजेश मोहिते याने अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी, एकाग्रता याच्या जोरावर प्रतिथयश असे गोल्ड मेडल प्राप्त केल्याबद्दल मास्टर राज राजेश मोहिते याचे बौद्धजन सहकारी संघ, गिमवी विभाग, गुहागर तालुक्याच्या वतीने कौतुक करण्यात आले तसेच तालुक्यात सर्वच स्तरातून मास्टर राज राजेश मोहिते याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











