भाई बहन का प्यार झिंदा… सुप्रिया सुळे यांची हकालपट्टी का? अजित पवार भडकले

0

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या. यामध्ये प्रदेशाध्यक्ष, महिला प्रदेशाशध्यक्ष, प्रवक्ते यांच्या निवडी केल्या आहेत. तर तुमच्या गटातून सुप्रिया सुळे यांची हकालपट्टी करणार का? या प्रश्नावर अजित पावर भडकले आहेत.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या हकालपट्टीच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, “आम्ही काय इथे फोडाफोडी करायला आणि हकालपट्टी करण्यासाठी बसलेलो नाही, तुम्ही काहीपण प्रश्न विचारू नका.” असं म्हणत ते पत्रकारांवर भडकले असून मूळ प्रश्नाला बगल दिली. त्याचबरोबल आमचाच पक्ष आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेच असतील असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

अजित पवार गटाने आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी, अजित पवार यांची विधीमंडळ नेते पदी आणि अनिल पाटील यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पक्षातील इतर पदांवरील नियुक्त्यांचे सर्व अधिकार हे तटकरे यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, शरद पवार गटाने नऊ आमदारांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली तर अजित पवार गटाने जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड विरोधात कारवाई करण्यासाठीचे पत्र विधासभा अध्यक्षांकडे पाठवले आहे. त्याचबरोबर आमच्याकडे आमदारांची संख्या किती याची चिंता करू नका, आमच्याकडे आमदारांची संख्या नसती तर कालचा शपथविधी झाला नसता असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

शरद पवार गटाने केलेल्या कारवाईवर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “कुठलाही वाद व्हावा अशी आमची इच्छा नाही, पक्ष कुणाचा हा निर्णय निवडणूक आयोग घेईल.