कुटुंबात २७ वर्षे आमदारकी, पण बारामतीलाच मोठी पदे दौंडचे मंत्रिपद पुन्हा एकदा लटकले?;

0

केडगाव – राज्यात मोठा राजकीय भूकंप झाल्याने दौंडचे आमदार राहुल कुल यांचे हातातोंडाशी आलेले मंत्रिपद हुकणार, असे चित्र असले; तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट कुल यांच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे तालुक्यातील कुल यांचे पारडे जड होणार, असे चित्र आहे. दौंडमध्ये राष्ट्रवादीच्या फुटीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

या राजकीय उलथापालथीमुळे दौंडला मिळणारे मंत्रिपदाची शक्यता आता धूसर झाली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळाली. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर जावे की खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबरच राहावे. कोणाबरोबरही गेले तर एक नेता नाराज होणार आहे. कार्यकर्त्यांना दोन्ही नेते हवे आहेत, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे कोण कुठे जाणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

पुणे जिल्ह्यात भाजपचा एकमेव आमदार म्हणून राहुल कुल यांच्याकडे पाहिले जाते. पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील असले, तरी त्यांनी जिल्ह्याच्या कामकाजात त्यांना मोकळीक दिली होती. जिल्ह्यात पुणे शहरातील आमदार माधुरी मिसाळ किंवा राहुल कुल, असे दोनच नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.

कुल यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी स्वतः मंत्रिपद घेत कुल यांना गाजर दाखविले. त्यानंतर सन २०१९च्या विधानसभा निवडणुकी, ‘कुल यांना निवडून द्या, मी त्यांना मंत्री करून दाखवतो,’ अशी ग्वाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

आता दोन दिवसांपासून कुल यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात असताना राष्ट्रवादीत फूट पडली. कुल यांच्या कुटुंबात २७ वर्षे आमदारकी आहे, पण बारामतीला नेहमी मोठी पदे आल्याने दौंडला आतापर्यंत नाकारले गेले. आज दौंडकरांना याचा पुन्हा प्रत्यय आल्याचे दिसून आले