अजित पवारांची नवी टीम तयार; विधानसभा अध्यक्षांकडं नियुक्त्यांचं पत्र सुपूर्द

0
1

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडानंतर अजित पवारांनी आपल्या सहकाऱ्यांसह सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये विधीमंडळ नेते, प्रदेशाध्यक्ष, प्रतोद, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महिला आघाडी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. तसेच या नियुक्त्यांचं पत्र देखील विधानसभा अध्यक्षांकडं देण्यात आलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, अजित पवार हे विधिमंडळ नेते आहेत. तेच पक्षाच्यावतीनं जबाबदारी सांभाळतील. अनिल पाटील यांनाच प्रतोद ठेवण्याची मागणी मी केली असून याबाबत विधानसभा अध्यक्षांना कळवलं आहे. थोड्याच दिवसांत विधानसभेचं सत्र सुरू होत आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीनंतर सुनील तटकरे म्हणाले, काल आम्ही सरकारमध्ये सामिल झालो. कालच माझी अध्यक्षपदी नियुक्ती झाली. माझ्यावर पुन्हा एकदा नव्यानं जबाबदारी टाकली आहे. पक्षाची ध्येय धोरणं, संघटना मजबूत करण्याचं काम मी करणार आहे.

भुजबळ म्हणाले, “महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भेटायला येत आहेत. प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती ही पक्षाच्या कार्यकारिणीनं केली आहे. मात्र, त्यांची बडतर्फी ही कर्यकारीणीनं केलेली नाही. जो काही निर्णय कार्यकारणी घेईल, तो बघता येईल.

अजित पवारांच्या गटातील नियुक्त्या अशा
प्रदेशाध्यक्ष – सुनील तटकरे

विधी मंडळ नेते – अजित पवार

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

प्रतोद – अनिल पाटील

महिला आघाडी अध्यक्ष – रुपाली चकाणकर

राष्ट्रवादी युवक काँग्रेस – सूरज चव्हाण