खातेवाटप झालं! आता ‘या’ पालकमंत्रिपदांची रस्सीखेच सुरू; दुहेरी तिहेरी दावे अन् स्थानिक दबावतंत्रही जोरातच

0

राज्यातील मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. परंतू या खातेवाटपात अनेक दिग्गज मंत्र्यांचं डिमोशन झाल्याचं दिसून येत आहे. यात पहिला क्रमांक आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा. एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाची मागणी केली होती. दरम्यान खातेवाटपानंतर आता कोणाकोणाला पालकमंत्रिपद मिळणार यावरुन चर्चा सुरू झाली आहे. आज शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रिपद आपल्यालाच मिळणार असल्याचं ठामपणे सांगितलं. त्यामुळे आता पालकमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. संजय शिरसाट यांनी जाहीर केलं असलं तरी भाजपचे अतुल सावेदेखील संभाजीनगरमधून शर्यतीत आहेत.

कोणत्या जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच-

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

1. पुणे – अजित पवार, चंद्रकांत पाटील

2. ठाणे -एकनाथ शिंदे, गणेश नाईक, प्रताप सरनाईक

3. सातारा – शंभूराज देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील

4. छ. संभाजीनगर -अतुल सावे संजय शिरसाट

5. यवतमाळ – संजय राठोड, अशोक उईके, इंद्रनील नाईक

6.नाशिक – माणिकराव कोकाटे, दादा भुसे, नरहरी झिरवाळ

7. जळगाव – गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, संजय सावकारे

8. बीड – धनंजय मुंडे, पंकजा मुंडे

9. रायगड – भरत गोगावले, अदिती तटकरे

10. कोल्हापूर -हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर

11. रत्नागिरी -उदय सामंत, योगेश कदम

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन