छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, तरी शिवद्रोही कोरटकरचा राजेशाही थाट? घरपोच पोलीस सुरक्षा

0

स्पेशल विमान कुठल्या मंत्र्यासाठी नाही तर हा राजेशाही थाट आहे शिवद्रोही प्रशांत कोटरकर याचा…छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणात अखेर कोरटकरला जामीन मिळालाय.. मात्र जामीन मिळाल्यानंतरही त्याच्या बडेजावात पोलिसांनी कुठलीच कसर सोडली नाही.

प्रशांत कोरटकर तुरुंगातून बाहेर येताच कोरटकरच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.. एवढंच नाही तर बंदी असलेल्या काळ्या फिल्मिंगच्या कार कोरटकरच्या दिमतीला उभ्या होत्या…  आधी याच कारमधून आणि त्यानंतर स्पेशल विमानाने कोरटकरला थेट घरपोच पोलीस सुरक्षेत पोहचवण्यात आलं….

मात्र कोरटकरला कोणत्या अटी-शर्तींसह जामीन मिळालाय ते पाहूयात…

महाराजांचा अवमान तरी जामीन

अधिक वाचा  मायक्रोसॉफ्टमधून एआयमुळे 60 हजार नोकऱ्यांवर गदा, 1 डिसेंबरचा वेळ दिला एआय टेक्नोलॉजीवर अधिक लक्ष केंद्रीत

कोरटकरला 50 हजारांचा जातमुचलक्यावर जामीन

पोलीस बोलावतील तेव्हा हजर राहणं बंधनकारक

साक्षीदार, फिर्यादींवर दबाव आणण्याचा प्रयत्न करु नये

महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांचा अवमान करुनही कोरटकरचा एवढा बडेजाव कशासाठी? वादग्रस्त वक्तव्यानंतर पोलीसांची एवढी फौज दिमतीला असेल तर कोरटकरसारखे वाचाळवीर जीभेला लगाम घालतील तरी कसे?