क्रीडा क्षेत्रातील मोठी बातमी! कॉमनवेल्थ गेम्समधून हॉकी, क्रिकेट, कुस्तीसह 13 खेळ काढले… का घेतला असा निर्णय?

0
24

कॉमनवेल्थ गेम्स 2026 अखेर स्कॉटलँडच्या ग्लासगो इथं होणार असल्याचं निश्चित झालं आहे. ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरिाय शहराने यजमानपदासाठी नकार दिल्यानंतर स्पर्धेसाठी नव्या ठिकाणाचा शोध घेतला जात होता. अनेक अडचणींचा सामना करत अखेर ग्लासगो इथली जागा निश्चित करण्यात आली. पण ही स्पर्धा भारतीय क्रीडा चाहत्यांसाठी निराशाजनक ठरणारी आहे. कारण या स्पर्धेत भारतीय खेळाडू हक्काची पदकं मिळवू शकतील असे खेळचं काढून टाकण्यात आले आहेत.

हे 13 खेळ कॉमनवेल्थमधून काढले
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची कामगिरी नेहमीच चांगली झाली आहे. विशेषत: हॉकी, क्रिकेट, कुस्ती, नेमबाजी आणि बॅडमिंटन सारख्या गेम्समध्ये भारतीय खेळाडू हक्काची पदकं मिळवतात. पण हेच खेळ कॉमनवेल्थ गेम्समधून काढून टाकण्यात आले आहेत. तब्बल 13 गेम्स कॉमनवेल्थ गेम्समध्ये नसणार आहेत. यात हॉकी, क्रिकेट, रग्बी सेवन, डायव्हिंग, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, रोड सायकलिंग, माऊंटेनबाईक, रिदमिक जिम्नॅस्टिक, स्क्वॅश, टेबल टेनिस, पॅरा टेबल टेनिस, ट्रायथलॉनय पॅरा ट्रायथलॉन आणि कुस्ती.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

भारताच्या पदक विजेत्या कामगिरीला धक्का
हॉकी, क्रिकेट, कुस्ती, बॅडमिंटन या खेळात भारतीय खेळाडूंनी नेहमीच वर्चस्व गाजवलं आहे. पण 2026 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये या खेळातील पदक विजेत्या कामगिरीला धक्का बसणार आहे. भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदकासाठी नेहमीच दावेदार राहिला आहे. पुरुष हॉकी संघाने गेल्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं. तर कुस्तीतही भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा राहिला आहे. बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधु सारखे खेळाडू ह्काचे पदक विजेचे खेळाडू आहेत. 2022 कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकेट खेळाचं पदार्पण झालं होतं. महिला संघाने यावेळी रौप्य पदक पटकावलं होतं.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

का काढण्यात आले 13 खेळ?
2026 कॉमनवेल्थ गेम्सचं यजमानपद व्हिक्टोरिया शहराकडे सोपवण्यात आलं होतं. पण स्पर्धेसाठी देण्यात बजेट वाढल्याने आयोजनावर संकट ओढावलं. या स्पर्धेसाठी व्हिक्टिरिया शहराने 2.6 बिलिअन डॉलरचा निधी मंजूर केला होता. पण ही रक्कम वाढून 7 बिलिअन डॉलर इतकी झाली. त्यामुळे व्हिक्टोरिया सरकारने असमर्थता दर्शवत माघार घेतली.

स्पर्धा रद्द होण्याचा धोका असतानाच स्कॉटलं मदतीला धावून आलं. स्कॉटलंने 2014 मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्यामळे स्कॉटलंडने कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन करण्याची तयारी दाखवली. पण बजेट कमी असल्याने काही खेळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये केवळ दहा गेम खेळवण्यात येणार आहेत. यात एथलेटिक्स, स्विमिंग, बॉक्सिंग आणि सायकलिंग सारखे खेळ आहेत.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा