गुळातली भेसळ कशी ओळखाल? भेसळयुक्त गूळ असतो विषारी-४ ट्रिक्स,

0

जकाल खाण्यापिण्याच्या प्रत्येक पदार्थ भेसळ दिसून येते. तेल, मिठाई, खवा, तूप, तांदूळ प्रत्येक पदार्थ भेसळयुक्त विकले जातात. (Cooking Hacks) दुकानदार फायदा मिळवण्याच्या नादात वस्तूंमध्ये भेसळ करतात.

साखरेपेक्षा गुळाचे सेवन करणं गुणकारी मानलं जातं. कारण गुळाचे सेवन केल्यानं शरीरातलं रक्त वाढतं आणि एनर्जी मिळते पण भेसळयुक्त गूळ तब्येतीसाठी धोकादायक ठरू शकतो.

बाजारात विकले जाणारे हानीकारक केमिकल्स, स्वस्त साखर वापरून हा गूळ बनवला जातो. गूळ खरेदी करताना त्याच्या शुद्धतेची पडताळणी करणं गरजेचं असतं. सोप्या पद्धतीनं तुम्ही गुळातील भेसळ ओळखू शकता आणि आजारांपासून दूर राहू शकता. कारण दिवाळीच्या आधी अनेक ठिकाणी भेसळयुक्त पदार्थांची विक्री होते. ही भेसळ टाळण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

रूरल ट्रे़जर्सच्या रिपोर्टनुसार गुळ विकत घेताना गुळाचा छोटा तुकडा चाखून पाहा. गुळाच्या प्रकारानुसार त्यांची चव गोड, कॉफीसारखी किंवा डार्क चॉकलेटसारखी असायला हवी. जर गूळ खारट लागत असेल तर त्यात भेसळ झाली आहे. गुळाचे प्रमाण वाढवण्यासाठी अनेकदा त्यात चॉक पावडर घातली जाते. गूळात चॉक पावडर आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही पाण्याची चाचणी करू शकता. ही एक सोपी, प्रभावी चाचणी आहे. गूळ पाण्यात वितळवायला ठेवा पाणी तपकिरी, अर्धपारदर्शक दिसले म्हणजे गूळ अस्सल आहे. जर गुळात बारीक कण तयार झाले आणि खाली तळाशी बसले तर यात पावडरची भेसळ असू शकते.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

भेसळयुक्त गुळ कसा ओळखाल?

१) सगळ्यात आधी एक ग्लास पाणी घ्या. त्यात गुडाचे छोटे तुकडे घालून वितळवून घ्या. शुद्ध गुळ पाण्यात पूर्णपणे विरघळेल. पण बनावट गूळ खाली बसेल.

२) जो गूळ शुद्ध असतो त्याचा रंग गडद भरा किंवा हलका पिवळा असतो. जो बनावट गूळ असतो त्याचा रंग चमकदार आणि जास्त पिवळा असतो. म्हणून गुळाचा रंग जास्त भडक असेल तर गूळ विकत घेताना विचार करा.

३) चिकट किंवा ओल्या गुळात भेसळ असण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी तुम्ही कडक गूळ विकत घेण्यास प्राधान्य द्या. या पद्धतीने घरच्याघरीच तुम्ही गुळाची शुद्धता तपासू शकता.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार