आगामी काळात तुम्हाला नक्की न्याय दिला जाईल;

0
1

पुणे: विधानपरिषदेवर संधी दिली नाही म्हणून राजीनामा देण्याचे जाहीर केल्यानंतर शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अचानक त्यांनी आपली राजीनाम्याची तलवार म्यान केली.पवार यांनी पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिला आहे, त्यामुळे लवकरच विधानसभा निवडणूक नियोजनासाठी शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मानकर यांच्या समर्थनासाठी पक्षाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे जाहीर केले होते. कोणाचाही राजीनामा मंजूर करणार नाही असे पवार यांनी सांगितले असल्याची माहिती मानकर यांनी दिली. आगामी काळात तुम्हाला नक्की न्याय दिला जाईल असा शब्द उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला. त्यामुळे राजीनामा देणार नाही, उलट पक्षाचे काम पूर्ववत अधिक जोमाने करणार आहे असे ते म्हणाले.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

मानकर यांना विधानपरिषदेवर घ्यावे अशी मागणी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी केली होती. ती मान्य झाली नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा सत्र सुरू केले होते. स्वत: मानकर यांनीही दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आपण राजीनामा देणार आहे, प्रामाणिकपणे काम करूनही पक्ष विचारत नसेल तर दुसरा काही पर्याय नाही असे ते म्हणाले होते. मात्र आता त्यांनी अजित पवार यांच्या भेटीनंतर आपला निर्णय बदलला आहे.