उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली;

0

 कणकवलीत नितेश राणेंविरोधात ‘शॉकिंग’ उमेदवार

द्धव ठाकरे शिवसेना गटाने आज १५ मतदारसंघातील दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनिल गोटे, अजय चौधरी यांच्या उमेदवारीचा समावेश आहे. याचबरोबर ठाकरे गटाने कट्टर विरोधी नितेश राणे यांच्या विरोधातही उमेदवार उतरविला आहे.कणकवली मतदारसंघातून नितेश राणे यांच्याविरोधात माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना ठाकरेंनी रिंगणात उतरविले आहे. २०१४ मध्ये जेव्हा नितेश राणे पहिल्यांदा निवडणूक लढवत होते तेव्हा संदेश पारकर हे राणेंसोबत प्रचार करत होते. पारकर यांनी नितेश राणेंना गावागावातील विखुरलेल्या प्रत्येक घरापर्यंत चिखलातून पायी चालत नेत पोहोचविले होते. आता याच नेत्याला ठाकरेंनी नितेश राणेंविरोधात उभे केले आहे. संदेश पारकर आणि राणे कुटुंबियांचे वैरही आहे. राष्ट्रवादीचे नेते सत्यविजय भिसे हत्या प्रकरणानंतर नारायण राणे विरोधी पक्ष नेते असताना राणेंचा बंगला जाळण्यात आला होता. तेव्हा संदेश पारकर राष्ट्रवादीत होते व नगराध्यक्ष होते. नंतरच्या राजकीय परिस्थितीत राणे-पारकर एकत्र आले होते. यानंतर पुन्हा राणे-पारकर यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आणि ते पुन्हा विरोधी बनले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

याचबरोबर ठाकरेंनी शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याविरुद्ध भायखळ्यातून मनोज जामसुतकर यांना उमेदवार केले आहे. धुळे शहरातूनअनिल गोटेंना उमेदवारी देण्यात आली आहे.

ठाकरे गटाची दुसरी यादी

१) धुळे शहर- अनिल गोटे

२)चोपडा (अज)- राजू तडवी

३) जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन,

४) बुलढाणा- जयश्री शेळके,

५) दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल

६) हिंगोली- रूपाली राजेश पाटील

७) परतूर- आसाराम बोराडे

८) देवळाली (अजा) योगेश घोलप

९)कल्याण पश्चिम- सचिन बासरे

१० )कल्याण पूर्व – धनंजय बोडारे

११) वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव

१२ ) शिवडी- अजय चौधरी

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

१३) भायखळा- मनोज जामसुतकर

१४) श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे

१५) कणकवली- संदेश भास्कर पारकर.